हॉटेल व्यावसायईकास पिस्तुलाचा धाक दाखवुन १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करुन दरोडा टाकणा-या टोळीस स्थानिक गुन्हे शाखा सातारा व भुईंज पोलीसांनी केले जेरबंद.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख (नाशिक पोलीस टाइम्स )
सातारा जिल्हा प्रतिनिधी 
हॉटेल व्यावसायईकास पिस्तुलाचा धाक दाखवुन १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करुन दरोडा टाकणा-या टोळीस स्थानिक गुन्हे शाखा सातारा व भुईंज पोलीसांनी केले जेरबंद.
दिनांक १ जुन २०२३ रोजी दुपारी ०१.१५ वाजणेचे सुमारास पोलीस अभिलेखावरील आरोपीचे साथीदारांनी मेनवली, ता. वाई जि. सातारा येथील एका हॉटेल व्यवसाईकास पिस्तुल रोखुन त्याचेकडे १० लाख रुपयाच्या खंडणीची मागणी करुन त्यास जीवे ठार मारण्याची धमकी देवुन त्याच्या गळयातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन जबरीने ओढुन चोरी करुन त्यास धक्काबुक्की व मारहान केली होती वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन वाई पोलीस ठाणे गु.र.नं. ४२५/२०२३, भादवि कलम ३९७, ३८५, ३८६, ३८७, १२० (ब) सह आर्म अॅक्ट कलम ३,२५अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक श्री. अरुन देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. अजय कोकाटे, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सातारा यांना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी स्वत:चे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संतोष पवार, सपोनि रविंद्र भोरे, पोउनि विश्वास शिंगाडे पोउनि अमित पाटील यांचे अधिपत्याखाली वेगवेगळी तपास पथके तयार करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तपास पथकांनी सर्वप्रथम घटणाठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करुन घटनाठिकाणचे साथीदार यांचेकडे विचारपुस करुन, सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करुन तसेच तांत्रीक विश्लेषन करुन गुन्हयातील आरोपींना निष्पन्न केले. त्यानंतर नमुद आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच भुईंज व वाई पोलीस ठाणेकडील अंमलदार यांचे मदतीने भुईंज, वाई, पुणे या ठिकाणहुन शोध घेवुन गुन्हयातील ११ आरोपींना गुन्हा दाखल झाल्यापासुन अत्यंत अल्प कालावधीत ताब्यात घेवुन नमुद गुंन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.बाळासाहेब भरणे हे करीत आहेत.श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. कमलेश मीना, परि. पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बाळासाहेब भालचिम,उप-विभागीय पोलीस अधिकारी वाई यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. बाळासाहेब भरणे,पोलीस निरीक्षक वाई, श्री. अजय कोकाटे, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक सातारा यांचे अधिपत्याखाली भुईंज
पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि श्री. संतोष पवार, सपोनि रविंद्र भोरे, पोलीस उप-निरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उप निरीक्षक अमित पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा सातारा व भुईंज व वाई पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!