स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई ; दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी असे एकुण २१ गुन्हे उघड करुन ३६लाख,७४,हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख पोलीस टाइम्स रिपोर्टर
गोंदवले खुर्द :
पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून १ दरोडा, १ जबरी चोरी, १९ घरफोडी चोरी असे एकुण २१ गुन्हे उघड करुन
चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिण्यापैकी चालू बाजारभावा प्रमाणे३५,८४,००० /- रुपये किमतीचे ६४ तोळे सोन्याचे
दागिणे व ४०००० /- रुपये किमतीचे चांदीचे दागिणे व ५०,००० रुपये किमतीची मोटार सायकल असा एकूण
३६,७४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापु बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील
घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना
दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली
एक तपास पथक तयार केले .
दि.१३/०४/२०२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त
झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी चाँद उर्फ सुरज जालिंधर पवार याचा लोणंद पोलीस ठाणे गु.र.नं. ८१/२०२३
भादविक ३९४, ४५७, ३४ या गुन्हयामध्ये सहभाग असून तो काळज गावचे हद्दीतील बडेखान या ठिकाणी आहे. तसेच
नमुद आरोपी हा अत्यंत हुशार असून तो गुन्हयाचे तपासकामी मिळून येत नव्हता. त्याच्या गुन्हे पध्दतीचा अभ्यास करुन
पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार तानाजी माने, अमोल माने, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे,
स्वप्नील माने, शिवाजी भिसे, स्वप्नील दौंड यांचे तपास पथकाने बडेखान परिसरामध्ये सतत तीन दिवस अहोरात्र
सापळा लावून रानावनात, काटेरी झाडाझुडूपातून त्याचा पाठलाग करुन आरोपी चाँद उर्फ सुरज जालिंधर पवार वय २२
वर्षे रा. काळज ता. फलटण जि. सातारा यास ताब्यात घेतले. त्याचेकडे लोणंद पोलीस ठाणे गु.र.नं.८१/२०२३ भादविक ३९४,
४५७, ३४ या गुन्हयाचे अनुशंगाने विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे साथिदार पृथ्वीराज युरोपियन शिंदे वय
२५ वर्षे रा.ठाकुरकी फलटण, चिलम्या उर्फ संदिप महावीर उर्फ माळव्या शिंदे वय २२ वर्षे रा. सुरवडी ता. फलटण व इतर तीन
साथीदारांचेसह केला असल्याचे सांगीतल्याने तीन आरोपींना नमुद गुन्हयात अटक करुन त्यांची ५ दिवस पोलीस कोठडी
घेतली. तसेच नमुद गुन्हा ६ आरोपींनी केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने गुन्हयास भा.द.वि.क.३९५, ३९७ ही
वाढीव कलमे लावण्यात आलेली आहेत. पोलीस कोठडी मुदतीत अटक आरोपींच्याकडून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या
मुद्देमालापैकी ४६,२००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, गुन्हयात वापरलेले हत्यार (कोयता) हस्तगत केला
तसेच आणखी २० गुन्हयातील एकूण ६४ तोळे सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, अर्धा किलो चांदीचे दागिणे, गुन्हयात
वापरलेली मोटार सायकल असा एकूण (चालू बाजार भावाप्रमाणे) ३६ लाख,७४ हजार, रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
करण्यात आलेला असून नमुद आरोपींच्याकडून १ दरोडा, १ जबरी चोरी १९ घरफोडीचे गुन्हे असे एकूण २१ मालमत्तेचे
गुन्हे उघडकीस आणले आहेत.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकलचोरी, इतर चोरी असे एकूण ६७
मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी १५३ तोळे सोन (१.५
किलो) असा एकूण १,३३,७६,८३०/- रुपये (एक कोटी तेत्तीस लाख शहात्तर हजार आठशे तीस रुपये) किमतीचा मुद्देमाल
हस्तगत करण्यात आलेला आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे,
अमित पाटील, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के,
विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, दिपाली यादव, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, अमोल माने, मुनीर मुल्ला,
अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, शिवाजी भिसे, स्वप्नील माने, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, विक्रम पिसाळ, प्रविण कांबळे,
स्वप्नील दौंड, केतन शिंदे, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख, वैभव सावंत, प्रविण पवार, सचिन ससाणे, पंकज बेसके, गणेश
कचरे, फॉरेन्सिक विभागाचे स.पो. नि. विजय जाधव, पोलीस अंमलदार राजू कुंभार, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित
झेंडे, ज्योती शिंदे, महेश पवार, अनिकेत जाधव, सुशांत कदम यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी
अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक. सातारा व श्री. बाप बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!