सातारा जिल्हा लोकसभेला सैनिक खासदार, : प्रशांत कदम (माजी सैनिक)

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते

कराड:प्रतिनिधी 

        रविवार दि. 10 मार्च 2024 रोजी अपशिंगे मिलिटरी येथे सैनिक निर्धार मेळावा संपन्न झाला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अपशींगे मिल्ट्री येथे शहीद स्मारकाला पुष्प चक्र अर्पण करून शहीद वीर जवानांना केले अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत कदम (माजी सैनिक) अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आजी-माजी सैनिक शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या अडचणी व सरकार दरबारी होत असलेली ससे होलपट याचा पाढा वाचला व सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील राज्याचे मा. मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे साहेब, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना वेळोवेळी सैनिकांच्या समस्या अडचणी विषयी स्वतः भेटून निवेदन दिली सातारा जिल्ह्यातील सैनिकांच्या समस्या विषयी मीटिंग लावावी सैनिकांचा मेळावा घ्यावा आमच्या अडचणी समजून घ्याव्या यासाठी वेळ मागितली परंतु सातारा जिल्ह्यातील ,महाराष्ट्रातील सैनिकांची बैठक बोलावण्यास वेळ नाही.ते पुढें म्हणाले
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात होऊन गेला मात्र या देशातील आपल्या मातृभूमीसाठी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक व भारत देशाच्या सीमेचे रक्षण करताना शहीद झालेले आर्मी,नेव्ही, एअरफोर्स व प्यारा मिलिटरी फॉर्सेस या सर्व भारतीय सैन्य दलातील शहीद जवान कुटुंबीय व माजी सैनिक कुटुंबीय त्यांचे पाल्य यांना न्याय मिळत नाही.
झोपलेल्या सरकारला व प्रशासनाला जागे करण्यासाठी व सैनिक, शेतकरी यांना कोणी वाली राहीला नाही अशावेळी आपण सर्वांनी सतर्क होऊन न्याय,हक्क, अधिकारासाठी सैनिक व त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबीय यांनी एकत्र आले पाहिजे *सातारा जिल्हयातील माजी सैनिक व सैनिक पत्नी, शहीद जवान कुटुंबीय यांची संख्या 35000 आहे व सेवारत सैनिक 12000 आहेत व प्यारा मिलिटरी फॉर्सेस मधील आजी/ माजी सैनिक, सैनिक पत्नी शहीद कुटुंब 33000 एकूण सर्वांची संख्या पहिली तर 80000 आहे .आम्ही सैनिक निर्णायक आहोत आमचे मतदान सैनिक व सैनिक पत्नी आणि दोन मुले 80 गुणिले 4 केले तर 3 लाख 20000 हजार एवढे मतदान आहे आम्ही सैनिक या सातारा जिल्हा लोकसभेला निरनायक आहोत ही लढाई कोणाच्या विरोधात नाही ही लढाई आपल्या न्याय हक्कासाठी आहे*असे ते म्हणाले व त्यांनी आपल्या खालील मागण्या बोलून दाखवल्या

शहीद जवान कुटुंबीयांच्या व आजी/माजी सैनिकांच्या प्रमुख मागण्या
1) भारतीय सैन्य दलात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना शेत जमीन तात्काळ मिळावी.
2) सरकारने दिलेल्या सैनिकांना व त्यांच्या परिवाराला शेत जमिनी वन विभागाच्या ताब्यात आहेत त्या तात्काळ निर्वणीकरण प्रस्ताव देऊन सैनिकांना ताबा देण्यात यावा.
3) जे माजी सैनिक नोकरी करत नाही त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना स्वस्त धान्य रेशन तात्काळ मिळावे.
4) मेगा हायवेला माजी सैनिकांना टोल माफी देण्यात यावी
5) महाराष्ट्र शासनाने सैनिक सैन्य सेवा बजावत असताना बॅटल कॅज्युअलटी व फिजिकल कॅज्युअलटी झालेल्या त्यांच्या पत्नी किंवा मुलांना शिक्षण अहर्ते नुसार सरकारी नोकरीत समाविष्ट करावे
6) केंद्र सरकारने वन रँक वन पेन्शन प्रमाणे बॅटल कॅज्युअलिटी व फिजिकल कॅज्युअल टी कुटुंबीय यामध्ये भेदभाव न ठेवता पेन्शन प्रणालीमध्ये समान पेन्शन लागू करावी.
7) शासन व प्रशासनामध्ये फिजिकल कॅज्युअलिटी सैनिक पत्नी,कुटुंबीय व बॅटल कॅज्युअलिटी सैनिक पत्नी, कुटुंबीय यामध्ये भेदभाव न ठेवता सर्वांना शासन दरबारी सन्मानाची समान वागणूक द्यावी.
8) भारतीय सैन्य दलातील शहीद झालेल्या सैनिकांचे स्मारकाची शासन दरबारी नोंद करावी व त्यांचे समाधी स्थळाचे संवर्धनासाठी व समाधी स्थळापर्यंत रस्त्यासाठी शासन स्तरावर डीपीटीसी मधून निधी रक्कम उपलब्ध करून देण्यात यावी.
9) महाराष्ट्र शासन नोकरीमध्ये माजी सैनिक यांचे सैन्यसेवेतील ग्रॅज्युएट सर्टिफिकेट ग्राह्य धरून त्यांना (यूपी एस सी, एम.पी.एस.सी)लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये संधी द्यावी.
10) भारतीय सैन्य दलामध्ये भरती होणारे जास्तीत जास्त युवक /युवती ही शेतकऱ्यांची व सैनिकांची मुलं असतात तरी केंद्र सरकारने युवक व युवती हे अग्निपथ योजनेत सैन्य दलात भरती होणारे अग्नीवीर यांना कायमस्वरूपी सैन्य सेवेत समाविष्ट करावे /त्यांचे पुनर्वसनाची जबाबदारी घेऊन हमीपत्र लेखी द्यावे.
11) सैनिक व सैनिक परिवारासाठी संरक्षण कायदा मंजूर करून अस्तित्वात आणावा.
12) माजी सैनिकांना व त्यांच्या परिवाराला संसदीय प्रणालीमध्ये आरक्षण द्यावे व शिक्षक मतदारसंघाप्रमाणे स्वतंत्र सैनिक मतदार संघ मिळावा.
13) सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना सक्षम करण्यासाठी सैनिक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी.
अशी महाराष्ट्र सरकारकडे व भारत सरकारकडे मागणी केली त्यांनी सैनिकांना व्यासपीठावरून विचारले आपण सातारा लोकसभा लढायची का सैनिक व शेतकऱ्यासाठी उमेदवार सैनिक सातारा लोकसभेला उभा करायचा का यावेळी सर्व माजी सैनिक ,त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीयांनी हात वर करून सैनिक सातारा जिल्ह्याच्या लोकसभेला अर्ज दाखल करायचा व निवडणूक लढवायची असे सर्वांनी एकमताने सांगितले हा सैनिक निर्धार मेळाव्यामध्ये निर्धार करण्यात आला
       यावेळी जम्मू काश्मीर येथे आतंकवादी लढाईमध्ये सन 1994 साली शहीद झालेले शहीद वीर जवान शिवाजी जगताप (कीर्ती चक्र )यांचा वीर पुत्र सुरज जगताप ने आपल्या भावना व्यक्त केल्या व ते म्हणाले मी एकुलता एक मुलगा पण वडील शहीद, आई त्यांच्या वारदख्याने मृत्युमुखी पावली पण आज 30 वर्षे झाली सरकारने शासकीय जमीन दिली नाही, नोकरी, कुठली सुविधा दिली नाही सरकार शहिदांच्या कुटुंबाच्या बाबतीत गंभीर नाही आम्ही आता वेगळा विचार करू जे प्रशांत कदम बोलले आहेत आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून सातारा लोकसभेचा उमेदवार सैनिक ,वीर पत्नी,वीर पुत्र असेल तर आम्ही सर्व सातारा जिल्ह्यातील शहीद जवान कुटुंबीय त्यांच्याबरोबर आहे असे त्यांनी म्हटले.

माणिक कदम अध्यक्ष आजी /माजी सैनिक प्यारा मिलिटरी संघ यांनी मनोगतामध्ये म्हटले महाराष्ट्र सरकार,केंद्र सरकार, गृह विभाग प्यारा मिलिटरी फॉर्सेस आजी/माजी सैनिक त्याचे कुटुंबीय यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर दखल घेत नाही. ज्या प्रमाणे प्रशांत कदम आजी/ माजी सैनिकांचे प्रश्न सोडवतात त्याचप्रमाणे पॅरामीलिटरी फॉर्सेसचे आजी /माजी सैनिक यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी आम्ही सर्व प्यारा मिल्ट्री फोर्सेस आजी /माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय प्रशांत कदम यांच्याबरोबर आहे जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे आमचा त्यांना पाठिंबा आहे असे त्यांनी म्हटले.

विलास घाडगे राज्य सल्लागार पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना यांनी आपल्या मनोगता मध्ये म्हटले सातारा जिल्ह्याच्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिकांना सैनिक म्हणून आमचा पाठिंबा आहे असे जाहीर केले.

     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाजीराव देशमुख अध्यक्ष पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी सरकारच्या नाक र्तेपणाचा पाढा वाचला सरकार आजी-माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंब, यांच्या विषयी गंभीर नाही राज्याचे मुख्यमंत्री यांनी माजी सैनिकांची कोणती मिटींग लावली नाही. प्रशांत कदम यांची सैनिक व त्यांच्या परिवाराविषयीची असलेली तळमळ बघून आम्हाला सुद्धा हाच गर्व वाटतो सैनिक असल्याचा त्यांनी जो आज निर्धार मेळाव्यात निर्णय घेतला आहे तो योग्य आहे सरकारला व लोकप्रतिनिधीला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे सैनिकांना ही वेळ आणली आहे निवडणुका लढवण्याची त्यासाठी सर्व सैनिकांनी प्रशांत कदम यांच्या पाठीशी उभे राहावे सातारा लोकसभेला सैनिक निवडून आणावा यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे असे त्याने मनोगतामध्ये म्हटले आहे.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत (नि.) यांनी म्हटले की मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत सैनिकांची मीटिंग लावली नाही सैनिकांचे प्रश्न सोडवले नाही याचे दुःख वाटते आता खरोखर ही वेळ आली आहे आता सैनिकांना निर्णय घेण्याची जो सातारा जिल्ह्यातील प्रशांत कदम व माजी सैनिक ,त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णया बरोबर मी आहे असे त्यांनी अध्यक्ष भाषणामध्ये म्हटले आहे
व प्रशांत कदम माजी सैनिक अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांना महाराष्ट्र न्यूज तर्फे “सैनिक योद्धा” पुरस्कार मिळाल्याबद्दल व महाराष्ट्र शासनाच्या सातारा जिल्ह्य संरक्षण कमिटीत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मनोज शिरसागर (माजी सैनिक) यांनी अपशिंगे मिलिटरी गावच्या वतीने व सर्व जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
        या प्रसंगी व्यासपीठावर समाधान निकम, महादेव निकम, शिवाजी पवार, सदाशिव नागणे, संजय पवार, शहीद वीर पत्नी उज्वला निकम, सौ विद्या बर्गे, सौ.उर्मिला पवार, सौ स्वाती बोराटे व सर्व सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे पदाधिकारी ,जिल्हा पदाधिकारी सर्व माजी सैनिक संघटना व त्याचे अध्यक्ष व माजी सैनिक, सैनिक पत्नी,वीर पत्नी बहुसंख्येने उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे आभार महादेव देशमाने यांनी मांडले व राष्ट्रगीताने सैनिक निर्धार मेळाव्याची सांगता झाली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!