किफायतशीर व्याजदराने कर्ज पुरवठा करणारी महाराष्ट्रातील नव्हे तर देश पातळीवरील बॅक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहिले जाते : अनिल देसाई

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी

          सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या वतीने मराठा समाजातील उद्योजकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे व्याज परतावा योजनेतून शून्य टक्के दराने रू. ४५ लाख कर्ज पुरवठा करून सिध्दनाथ अर्थमूव्हर्सचे मालक गायकवाड बंधूंना पोकलेनचे वितरण करण्यात आले
      या वेळी जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सरव्यवस्थापक     राजेंद्र भिलारे, उपव्यवस्थापक संदिप वीर, विभागीय विकास अधिकारी भाऊसाहेब शिंगाडे, शाखाधिकारी सौ सविता शिंदे, सह अजित गायकवाड, विजय गायकवाड, रामदास गायकवाड तसेच कारखेल हवलदारवाडी येथील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते

          यावेळी जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले मराठा समाजातील उद्योजकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या योजनेतून शून्य टक्केने कर्ज पुरवठा तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कृत इतर जाती जमाती मधील सर्व घटकांसाठी व्याज परतावा योजनेतून व्यवसाय उभारणीसाठी कर्जे, इत्यादी अनेक विविध कर्ज योजनांचे माध्यमातून किफायतशीर व्याजदराने कर्ज पुरवठा करणारी महाराष्ट्रातील नव्हे तर देश पातळीवरील बॅक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहिले जाते तरी ग्राहकांनी बॅकेच्या व शासकीय योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन देसाई यांनी केले
       तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यव्थापक श्री भिलारे साहेब म्हणाले आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून म्हसवड शाखेच्या वतीने आतापर्यंत ३० ग्राहकांना, सभासदांना या योजनेच्या माध्यमातून कुकूटपालन, शेळी, म्हैस, गायी खरेदी, त्याच प्रमाणे गोठा बांधकाम, वाहन खरेदी पोकलेन खरेदी जे सी बी खरेदी हॉटेल व्यवसाय आदी साठी कमी वेळेत, कमी कागदपत्रात, कमी व्याज दराने कर्ज वाटप करण्यात आली आहेत तरी ज्या सभासदांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी बॅकेचे संपर्क करण्याचे आवाहन शाखाधिकारी शिंदे मॅडम यांनी सांगितले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!