सातारा जिल्ह्यात आजी-माजी सैनिक संरक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड

 – सातारा जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार, 14 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा येथे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र सैनिक कल्याण विभागाच्या सहकार्याने “सैनिक संरक्षण समिती” आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत माजी सैनिक प्रशांत कदम यांनी सातारा जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांवर विनाकारण खोटे गुन्हे दाखल होण्याच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. यासंदर्भात माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखालील सैनिक फेडरेशनने 6 जानेवारी 2021 रोजी पोलीस महासंचालकांना निवेदन दिले होते. त्यानुसार, पोलीस महासंचालकांनी संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांना सैनिकांवर चौकशीपूर्वी कोणताही गुन्हा दाखल करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते.

याची दखल घेत सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी 18 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृत परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार, कोणत्याही आजी-माजी सैनिकाविरोधात चौकशीपूर्वी गुन्हा दाखल केला जाणार नाही.

या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनने जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!