सर्व इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या अनेक प्रकारच्या नाट्यमय घडामोडी नंतर अखेर कुंभारगांवच्या सरपंचपदी ॲड.स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पंचवार्षिक निवडणूक 202l या कालावधीत झालेल्या एकाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गट सदस्यांमध्ये कलगीतुरा रंगून वेगळा विचार करून म्हणजे भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन करण्यात आली. नंतरच्या काही काळातच काही सदस्यांनी राष्ट्रवादी कोटात प्रवेश केला. आणि तेथून पासूनच गावातील सत्ता संघर्ष पेटत गेला. कारण गावातील जि.प शाळेसाठी आलेल्या कामाच्या निधिमध्ये पैशाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सरपंच यांच्यावर करण्यात आला.आणि पहिले विराजमान सरपंच यांना आयुक्तांनी अपात्र ठरविल्याचा मुद्दा निकाली निघाला आणि पुढील निवडणूक घेण्यास सांगितले,पण काही राजकीय दबावाखाली तसेच ग्रामविकास मंत्रालयाकडून कोणताही मुद्दा विचारात न घेता त्यांनी अपात्र निकाल पात्र असा जाहीर करून परत पहिल्याच सरपंचांना संरपंच पदावर विरामान केले,त्याचा जल्लोषही मोठा करण्यात आला,नंतर या निकालाची दाद मागत हायकोर्टात आपील करण्यात आले व हायकोर्टाने परत निकाल अपात्र ठरविल्याचा दिला आणि निवडणूक घेण्याचे आदेश काढले. त्यानंतरच परत सर्व प्रक्रिया करण्यात येऊन दि.१६ रोजी निवडणूक घेतली असता सरपंचपदी ॲड. स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच पदाच्या निवडीनंतर स्नेहल धुमाळ म्हणाल्या की गावच्या सर्वांगीण विकासाकरीता आपण सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील कामकाज करणार आहोत. यामध्ये आम्ही कुणाशीही भेदभाव करणार नाहीत आणि नागरिकांना सरपंच या नात्याने कशाचीही कमतरता भासू देणार नाही. गावच्या विकासाकरता जेवढे करता येईल तेवढे काम करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सरकारी अधिकारी समवेत महत्वाची भूमिका मांडणारे कुंडलिक धुमाळ तसेच सर्व ग्रा. पं. सदस्य, उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.