सारथीच्या विद्यार्थ्यांची रायगडावर स्वच्छता मोहीम.

बातमी Share करा:

 

व्हिजन 24 तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सुशील यादव
रायगड
म्हसळा –

         राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था,सारथी पुणे यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या सिएसएमएस डीइइपी डिप्लोमा कोर्सच्या विद्यार्थ्यांमार्फत दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ले या ठिकाणी जाऊन ‘सरदार हिरोजी इंदुलकर किल्ले संवर्धन’ अंतर्गत संपूर्ण रायगड किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली.

        कार्यक्रमास उप व्यवस्थापकीय संचालक संदीप पवार सारथी एमकेसीएलचे मंगेश जाधव,सिद्धेश गोसावी,विश्वास मते,माधव गोरे,सारथी प्रकल्प म्हसळा तालुका आयकॉन संगणक केंद्र चालक सिकंदर आकलेकर,केंद्र सहाय्यक जल्पा शहा,मारुफा वस्ता, सारथीचे विद्यार्थी मेघा शिंदे,स्वरूप शिगवण,प्रवेशा पडावे,ऋतुजा शिंदे,साक्षी बामणे,नवीना जोशी,हर्षदा काप,रेखा भऊड,प्रांजली चिन्चुलकर,ओम गिजे,हितेश शिंदे,प्रगती धाडवे,रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील केंद्रांचे केंद्रचालक,केंद्र सहाय्यक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.गडावरील सर्व प्लास्टिक व इतर प्रकारचा कचरा उचलुन त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.

        विद्यार्थ्यांचे कार्य पाहून गडावर महराजांच्या दर्शनासाठी आलेल्या सर्वच पर्यटकांनी आणि सारथी अधिका-यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे आयोजनात विद्यार्थ्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि कार्यक्रमाची सांगता झाली


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!