पोलीस हवालदार संतोष बागल यांनी बालकाश्रमातील स्थलांतरीत बालकांना खाऊसह अन्नधान्याचे वाटप करून केला आपला वाढदिवस साजरा
व्हिजन २४ तास न्यूज
संपादक; अहमद मुल्ला
म्हसवड दि. २४
म्हसवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष बागल यांनी बालकाश्रमातील स्थलांतरीत बालकांना खाऊसह अन्नधान्याचे वाटप करून आपला वाढदिवस या बालगोपाला सोबत साजरा करीत सर्वांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
सैन्य दलात काम केलेले व म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये वाहतुक शाखेत कार्यरत असलेले संतोष बागल हे म्हसवड सह परिसरात मेजर म्हणुनच सर्वांना परिचीत आहेत, चेहऱ्यावर जरब पण मनाने खुप हळवे असलेल्या या मेजरने आपले कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकीही जोपासण्याचे मोठे काम केले आहे. म्हसवड पोलीस दलात बागल हे एकमेव कर्मचारी असावेत की ज्यांची अवैध वाहतुक व व्यवसाय करणाऱ्याच्या मनात दहशत कायम आहे,
अशा या कर्मचाऱ्याने मात्र कर्तव्याप्रमाणे नेहमीच सामाजिक कार्यातही स्वत:ला झोकुन दिल्याचे आजवर पहावयास मिळाले आहे. कोरोना काळात तर स्वत:चा जिव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावले आहे त्यामुळे सामान्य म्हसवडकर जनता या व्यक्तीवर विशेष प्रेम करते अशा या कर्तव्यबाज व धडाकेबाज व्यक्तीने 23 जानेवारी रोजी असणारा आपला जन्मदिवस अगदी साध्या पध्दतीने व सामाजिक कार्य करून साजरा करण्याचा निश्चय केला, बागल यांचा हा निर्णय अतिशय स्तुत्य असल्याचे कौतुक करीत भुजबळ यांनी बागल यांच्या निर्णयाला आपला पाठींबा दर्शिवला त्यामुळे बागल यांनी ही मग आपल्या वाढदिनाचे औचित्य साधत आपले कुटुंबातील आई, पत्नी, मुलगी व सासु सासरे यांना बरोबर घेऊन माणच्या माळरानावर असलेल्या पानवण या गावातील संत गजानन बालकाश्रम गाठले आपले सर्व मित्र व सहकारी यांना तेथेच बोलाऊन बाळगोपाळांच्या संगे आपला वाढदिवस साजरा करताना मनसोक्त आनंद तर लुटलाच या शिवाय येथील निरागस बालकांचाही आनंद द्विगुणित केला.
आपल्या वाढदिनाचा केक कापताना या बालकांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तु ही बागल यांनी त्यांना भेट दिल्या या शिवाय या बालकांचे संगोपन करणाऱ्या सखाराम तोरणे व रमाताई तोरणे यांच्याकडे अन्नधान्य व किराणा साहित्याचे किट सुपुर्त केले. बागल यांचा हा उपक्रम पोलीस दलाची शान निश्चितच वाढवणारा ठरणार आहे, सर्वच समाजातील युवकांनी संतोष बागल यांचा आदर्श घेतल्यास लवकरच रस्त्यावरच केक कापुन हिजडवाद घालणाऱ्या प्रवृत्तीसमोर नवा आदर्श उभा राहिल अशाच प्रतिक्रिया यानिमित्ताने समोर येत आहेत. बागल यांच्या या स्तुत्य उपक्रमात पत्रकारांनीही सहभागी होत बागल यांचा उत्साह वाढवण्याचे काम केले. यावेळी स. पो. नि. राजकुमार भुजबळ, स.पोलीस फौजदार डोईफोडे पत्रकार बापुसाहेब मिसाळ, विजय भागवत, पोपट बनसोडे, विशाल माने ,अहमद मुल्ला ,अब्दागीरे साहेब, योगेश स्वामी,बोडरे, सखाराम तोरणे, रमाताई तोरणे व बालकाश्रमातील सर्व निरागस बालके या सर्वांनी एकत्रित येत बागल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.