संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा म्हसवड येथे उत्साहात साजरा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड |
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन म्हसवड येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाले. समाजाचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.
या वेळी संपूर्ण पालखी मार्ग रंगबिरंगी रांगोळ्यांनी सजवून पायघड्यांनी विलोभनीय करण्यात आला होता. ड्रेस कोड या वर्षीही काटेकोरपणे पाळण्यात आला. पुरुषांनी पांढरे पोशाख, टोपी आणि गमजा परिधान केले होते, तर महिलांनी आंबा रंगाच्या साड्या व गुलाबी फेट्यांमध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे एकतेचे दर्शन घडले.
दरम्यान मंदिरात गेले आठवडाभर ज्ञानेश्वर पारायण करण्यात आले होते
कार्यक्रमात गायत्री फुटाणे हिच्या मार्गदर्शनाखाली “माऊली माऊली” या भक्तिगीतावर टाळ-मृदंगाच्या साथीने सादर झालेली नृत्यरचना विशेष आकर्षण ठरली. पालखी मिरवणुकीने शहरात वाजतगाजत काढण्यात आली आणि मंदिरात आगमनानंतर ह.भ.प. जगदीश महाराज पोरे यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यांच्या कीर्तनास दिगंची येथील आध्यात्मिक विद्यालयाचे कुंभार महाराज व शिष्यवर्ग यांची भक्तिपूर्ण साथ लाभली.
कार्यक्रमात नाथ मंदिर सालकरी, पद्माकर वाळुंजकर, पत्रकार विजय टाकणे, संजय भागवत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित गौरवही करण्यात आला.
सूत्रसंचालन राहुल फुटाणे यांनी ओघवत्या भाषेत केले. महाप्रसादाचे आयोजन शैलेश डोंगरे व कुटुंबीयांनी केले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप नामदास, शार्दूल फुटाणे, विजय चंदवाले, गणेश नामदास, नामदेव चंदवले, अतुल फुटाणे, चंद्रकांत पोरे, भारत पोरे, प्रकाश डोंगरे, मोहन पतंगे सौ अंजली फुटाणे,सौ सुवर्णा पोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या सोहळ्यामुळे संत नामदेव महाराजांची भक्तिपंरपरा आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ झाला आहे, असे मत सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.