संत सेवालाल महाराजांचा जन्म कर्नाटक राज्यात गुत्तीबल्लारी गावी १५ फेब्रुवारी १७३९ रोजी झाला. त्यांचे जयंती निमित्त बंजारा समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
म्हसळा तहसील कार्यालय ते बाजारपेठ मार्गे पाचगाव आगरी समाज सभागृह पर्यंत मोठ्या उत्साहात संत सेवालाल महाराज यांचे फोटो प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.समाजातील लहान थोर बांधवांनी सहभाग घेवून पारंपारिक वेशभूषात संपूर्ण शहरभर सेवालाल महाराजांचा जयघोष केला.पाचगाव आगरी समाज सभागृहात संपन्न झालेल्या जयंती सोहळा महोत्सवास तालुका बंजारी समाज अध्यक्ष धेनु चव्हाण,उपाध्यक्ष शंकर चव्हाण,सचिव प्रवीण चव्हाण,खजिनदार देवेंद्र पवार आदि समाज बांधव उपस्थित होते.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना समाजाचे अध्यक्ष धेनु चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी संपूर्ण आयुष्यभर सर्वस्वाचा त्याग करुन समाजाला मान- सन्मान प्राप्त करुन दिला.त्यांचा हा त्याग समाजासमोर एक आदर्श असून प्रत्येकांनी त्यांच्या आदेशाच पालन करणे आवश्यक आहे.सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी एकसंघ राहण्याचे आवहान चव्हाण यांनी केले.मिवणुक यशस्वी पार पाडण्यासाठी म्हसळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज चौधरी यांच्यासह पोलिस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.