म्हसळा शहरात संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी; समाज बांधवांचा मोठा सहभाग
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सुशील यादव
म्हसळा (प्रतिनिधी):
म्हसळा शहरामध्ये संत रोहिदास महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. ‘संत रोहिदास युवा मंच, म्हसळा’ यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यानिमित्त संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतील नागरिक आणि तरुणांची मोठी उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी प्रामुख्याने सौरभ गोरेगावकर, सिद्धेश म्हशीलकर, पंकज वाळवाटकर, योगेश चांदोरकर, प्रतीक गोरेगावकर, सूरज वाळवाटकर, समर्थ म्हशीलकर.
सुरेश चांदोरकर, सुभाष वाळवटकर, गणेश चांदोरकर, स्वप्नील चांदोरकर, मंगेश म्हशीलकर, सरोज म्हशीलकर, गणेश म्हशीलकर हे उपस्थित होते.
केवळ तरुणच नव्हे, तर समाजातील महिला मंडळानेही या जयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सर्व समाज बांधवांनी एकत्र येत संत रोहिदास महाराजांच्या समतेच्या आणि मानवतेच्या संदेशाचा जागर केला. या कार्यक्रमाने म्हसळा शहरात सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवून आणले.

