म्हसवडमध्ये संत नामदेव महाराज जयंती उत्साहात साजरी — समाज एकतेचा संदेश देत सुवर्णाताई पोरे यांचे प्रेरणादायी विचार

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड :प्रतिनिधी
संत नामदेव महाराजांनी साडेसातशे वर्षांपूर्वी भागवत धर्माची पताका फडकवली आणि त्या धर्माची दिव्य ज्योत आजही समाजबांधवांनी प्रज्वलित ठेवण्याची गरज आहे,” असे प्रेरणादायी विचार नामदेव समाज परिषदेच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा सुनील पोरे यांनी व्यक्त केले.

     म्हसवड येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या ७५५ व्या जयंतीनिमित्त नामदेव समाज परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांतून संतांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव समाजोन्नती परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे हे होते. यावेळी ट्रस्टी चंद्रकांत पोरे, अतुल फुटाणे, संदीप नामदास, विजय चांदवले, प्रताप फुटाणे, अश्विनी फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

      सकाळी संत नामदेव महाराजांच्या मंदिरात काकड आरती, अभिषेक, भजन-कीर्तन यांसह जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर समाजबांधवांना कार्तिकी एकादशीनिमित्त फराळाचे वाटप करून सामूहिक एकात्मतेचा आनंद साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना सुवर्णाताई पोरे म्हणाल्या,

   “संत नामदेव महाराज हे केवळ शिंपी समाजाचे नव्हे तर संपूर्ण मानवतेचे संत होते. त्यांनी भागवत धर्माचा प्रचार-प्रसार संपूर्ण भारतभर केला. त्यांच्या विचारांमधून समाज एकत्र येतो, संस्कार बळकट होतात आणि अध्यात्माचा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचतो.”

      जयंतीनिमित्त समाज इतिहास आणि वंशपरंपरेवरील एक विशेष दस्तावेज ‘संत नामदेव शिंपी समाज म्हसवड कुटुंब माहिती पुस्तिका’ तयार करण्यात आला. ही पुस्तिका अतुल मुरलीधर फुटाणे यांनी संकलित केली असून ती ट्रस्टी श्री. चंद्रकांत किसनराव पोरे आणि जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील श्रीधर पोरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप नामदास, विजय चांदवले, प्रताप फुटाणे, अश्विनी फुटाणे यांनी परिश्रम घेतले. म्हसवड शहर व परिसरातील शिंपी समाजबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत नामदेव महाराजांच्या कार्यास अभिवादन केले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *