म्हसवड येथे संत नामदेव जन्मोत्सव उत्साहात साजरा*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
कार्तिक एकादशी दि २३ नोव्हेंबर २०२३ रोजी काकड आरती षोडशोपचारे अभिषेक करून पांचगणी येथील प्रा सौ आकांक्षा बोंगाळे यांचे संत नामदेव महाराज यांच्या जीवनावर आधारित जन्म ते समाधी पर्यंत सुश्राव्य व्याख्यान आयोजन केले होते त्याचा समाज बंधु भगिनींनी मंत्रमुग्ध होऊन लाभ घेतला
यावेळी महाराष्ट्र राज्याचे नामदेव समाजोन्नती परिषदेचे नुतन अध्यक्ष संजय नेवासकर व सौ सीमाताई नेवासकर सपत्नीक उपस्थिती होती त्यांचा यथोचित सत्कार सातारा नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि सुनील पोरे व सौ सुवर्णा पोरे यांचें हस्ते करण्यात आला तर म्हसवड चे सुपुत्र वैभव विठ्ठल पोरे यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार राज्याध्यक्ष संजय नेवासकर यांचे हस्ते करण्यात आला सौ आकांक्षा बोंगाळे यांचा अश्विनी फुटाणे यांनी तर नुतन नासपचे विश्वस्त म्हणून निवड झालेले मसुरचे दिलीपकाका लंगडे यांचा सत्कार जेष्ठ समाज बांधव देविदास पोरे व प्रदीप पोरे यांचें हस्ते करण्यात आला महिलांनी पाळणा गीते गायली व फुल उधळण करुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला
यावेळी बोलताना आपले मनोगत व्यक्त करताना आत्तापर्यंत झालेल्या अनेक सत्कारा पेक्षा हा लाखमोलाचा सत्कार आहे असे मी मानतो तर राज्याध्यक्ष संजय नेवासकर यांनी सातारा जिल्ह्यात लक्षणीय कामगिरी केले बद्दल इंजि सुनील पोरे यांचें कौतुक करुन महाराष्ट्र राज्य नासपचे वतीने सुनील पोरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी नासपचे सरचिटणीस अजय फुटाणे, नाशिक विभागीय उपाध्यक्ष रवींद्र राहणे, नाशिक जिल्हाध्यक्ष अतुल मानकर, पुण्याचे पंकज सुत्रावे, चार्टर्ड अकाऊंट अजिंक्य शिंदे मसुरचे दत्ता वेल्हाळ, चंद्रकांत पोरे, बाळासाहेबं चांडवले,विजय चांडवले, गणेश नामदास, रमेश पोरे,संजय डोंगरे आदी समाज बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश पोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय चांडवले, संदीप नामदास,अतुल फुटाणे,प्रताप फुटाणे,विजय जवंजाळ, नामदेव चांडवले,नंदु पोरे आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले प्रबोधीनी एकादशी निमित्त सर्वांना प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी उपवासाचे लाडू वाटत करण्यात आले …