महात्मा जोतीराव फुले यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णीवर कायदेशीर कारवाई करावी : प्रा. कविता म्हेत्रे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड –
संग्रामनायक महात्मा जोतीराव फुले यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे मागणीचे निवेदन प्रा. कविता निवृत्ती म्हेत्रे यांनी म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार भुजबळ यांना निवेदनाद्वारे केली आहे.
उपरोक्त विषानुसार तक्रार अर्ज सादर करते की संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हा शिवप्रतिष्ठान नावाची संघटना चालवतो. सदर व्यक्तीने अमरावतीमध्ये महात्मा जोतीराव फुले यांच्या विषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले आहे. “इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवायचे हे शिकवण्यासाठी देशात सुधारक नावाची जात पैदा केली. निवडक सुपर पंढांना समाजसुधारकांच्या पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. महात्मा फुले ही याच समाजसुधारक नावाच्या भडव्यांच्या यादीतले आहेत.” संबंधित वादग्रस्त विधानाच्या वक्तव्याचे पुरावे समाज माध्यमावर उपलब्ध आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांचे समाज परिवर्तनापती आणि माझ्यासारख्या अनेक महिलांसाठी मोठे योगदान आहे. ज्या ब्राह्मणव्यवस्थेने आम्हा महिलांना आणि बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता त्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली म्हणूनच माझ्यासारख्या अनेक महिला शिकल्या, उच्च पदावर पोहोचल्या आणि सन्मानाने जगायला लागल्या. बहुजन समाजावर महात्मा जोतीराव फुले यांचे अपरिमित उपकार आहेत. स्त्री-पुरुष विषमता, जातीयता, अनिष्ट प्रथा याविरुद्ध महात्मा जोतीराव फुले यांची लढाई समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी होती. त्यासाठी त्यांनी त्यांचे जीवन वाहून घेतले होते. अशा युगपुरुषाविषयी अत्यंत संतापजनक वक्तव्य करणाच्या खोडसाळ संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
याआधीही सदर व्यक्तीने समाजात धार्मिक व जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य जाहीरित्या केली आहेत. मध्यंतरी त्याने 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाहीच, तिरंगा ध्वज याबद्दल सुद्धा अवमानकारक वक्तव्य केले आहे. अमरावतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चरित्रहनन करणारे वक्तव्य केले आहे. हे सर्व प्रसार माध्यमात उपलब्ध असून पुराव्यासाठी आपण गुगल द्वारे सर्च घ्यावा. ही सर्व वक्तव्ये अतिशय गंभीर आहेत. समाजात तेढ निर्माण करणारी आहेत मात्र गृह खात्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.
संभाजी भिडे च्या अपमानकारक वक्तव्यामुळे महात्मा फुले प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत तरी महात्मा जोतीराव फुले यांचा जाहीररीत्या अपमान करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रा. कविता निवृत्ती म्हेत्रे यांनी पोलिसांकडे केली आहे.l