संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करणार इजि.सुनील पोरे*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
By: अहमद मुल्ला
म्हसवड
म्हसवड येथील शिंपी समाज बांधव व भगिनी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नामदेव समाजोन्नती परिषद सातारा जिल्हाध्यक्ष इंजि.सुनील पोरे यांचे अध्यक्षतेखाली येथील संत नामदेव महाराज मंदिरात शनिवारी दि १७/६/२०२३ रोजी संपन्न झाली यावेळी १५ जुलै २०२३ रोजी संपन्न होणारा संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात वैशिष्ट्येपुर्ण वातावरणात साजरा करावयाचे सर्वानुमते ठरले त्याचबरोबर समाजातील इतर उद्भवणारे अडचणी वर साधक बाधक चर्चा झाली यावेळी चर्चेत नामदेव चांडवले,मंगेश डोंगरे,विजय चांडवले, जगन्नाथ चांडवले,विजय जवंजाळ,पंतगे गुरुजी,डोंगरे गुरुजी,भिकु पोरे,सौ अश्विनी फुटाणे,सौ सुवर्णा पोरे ,सौ पंतगे काकु आदींनी भाग घेतला प्रस्तावित सचीव भिकु पोरे यांनी केले तर उपस्थित महिला व बांधव यांचे स्वागत व आभार अतुल फुटाणे यांनी केले तर भोजनासह इतर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संदीप नामदास, गणेश नामदास, शार्दुल फुटाणे, देवीदास पोरे, अॅड शुभम पोरे आदीने परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला..