सैनिक समाज यशवंत पुरस्कार 2023 सामाजिक कार्यकर्ते दीपक खडंग यांना प्रदान
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड (प्रतिनिधी )
सैनिक समाज यशवंत पुरस्कार २०२३ चा सामाजिक कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष दिव्यांग आघाडी सातारा दीपक खडंग यांना प्रदान करण्यात आलामहाराष्ट्र सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा व यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट( वडगाव) उंब्रज आयोजित सैनिक व पोलीस शहीद परिवार सन्मान सोहळा व सैनिक समाज यशवंत पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवार दि. २ रोजी कराड येथे संपन्न झाला यावेळी उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक खडंग यांना त्यांच्या सामाजिक कार्यातील दखल घेत२०२३ चा सैनिक समाज यशवंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत कदम( माजी सैनिक संस्थापक अध्यक्ष यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट) यांनी केले होते कार्यक्रमात शहीद पोलीस व सैनिक यांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी जितेंद्र डु डी सातारा आनंदराव पाटील नाना (माजी आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य )शंकरराव शेजवळ (भाजप कराड तालुका अध्यक्ष )यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमास विजय पवार तहसीलदार( कराड) मेजर आनंद पाथरकर (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा) रामकृष्ण वेताळ( प्रदेश सचिव किसान मोर्चा भाजपा महाराष्ट्र राज्य) सत्वशील कदम (सिव्हिल इंजिनिअर )इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली दरम्यान दिव्यांग भगिनी सुजाता साळुंखे (वराडे )यांना व्हील चेअर दीपक खडक यांच्यामार्फत देण्यात आली तसेच दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी दीपक खडंग यांनी सांगितले