साहेबराव भांड यांचे आल्पशा आजाराने निधन.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक: अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले- प्रतिनिधी
बिदाल ता.माण येथील प्रगतशील शेतकरी,उद्योजक कै.साहेबराव अनंत भांड यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी आल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन विवाहित मुले,दोन विवाहित मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.
कै.साहेबराव भांड यांनी बिदाल ता.माण या गावच्या सामाजिक कार्यात आग्रेसर व प्रभावी विकासासाठी योगदान दिले आहे त्यांच्या अकाली निधनाने बिदाल गावावर शोककळा पसरली आहे.
माण तालुका मराठी पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार श्री.विजय ढालपे यांचे ते मामा होत.भांड कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य,कार्यकारी अधिकारी मा.ज्ञानेश्वर खिलारी यांच्या सह अनेक अधिकारी,राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर हजर होते.