कुरेश कॉन्फरन्स’ राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी सादिक खाटिक

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
आटपाडी प्रतिनिधी

     ‘कुरेश कॉन्फरन्स’ (नवी दिल्ली) या मुस्लिम खाटिक समाजाच्या देशव्यापी सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते सादिक पापामियाँ खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सनोबर अली कुरेशी यांनी दिले. खाटीक यांचे निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.

        सन २०२४ ते २०२८ कालावधीसाठी खाटीक यांची नियुक्ती झाली आहे. केंद्रीय समितीच्या ठरावानुसार केंद्रीय कार्यसमितीने हा निर्णय घेतला. भारतातील मांसाहार करणारे सर्व बांधव, पशुपालन करणारे शेतकरी, पशुपालक व या व्यवसायात सक्रिय मुस्लिम खाटीक बांधवांसह अन्यधर्मीय खाटीक बांधवांशी निगडित वैध प्रश्न, समस्या,

सोडविण्यासाठी संस्था प्रयत्न करते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, अल्पसंख्याक विभाग प्रदेशचे महासचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) च्या ओबीसी विभागाचे ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

           न्या. सच्चर आयोगाच्या शिफारशी, त्याच्या अंमलबजावणी, मुस्लिम खाटीक समाजाचा एससी प्रवर्गात समावेश व्हावा. यासह मुस्लिम समाजाच्या हितासाठीच्या योजना राबवण्याबाबत नियोजन आयोगापासून ते राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागापर्यंत विविध पातळीवर गेली अनेक वर्ष खाटीक हे प्रयत्नशील आहेत. मुस्लिम खाटीक समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर हा विषय चर्चेत यावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!