व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
इंदापुर(प्रतिनिधी)
गणेश मिंड शनिवार दिनांक ९ नोव्हें.रोजी जैन श्रावक संघ भिगवण यांच्या सुरू असलेल्या चातुर्मासप्रसंगी अ. भा. मराठा महासंघ भिगवण शाखेच्या वतीने त्यांच्या एकूण ५२ सभासदांनी जैन धर्मानुसार साध्वीरत्न परमपूज्य विचक्षणाजी महाराज साहेब एवम् संकल्प दर्शनाची महाराज साहेब यांच्या प्रेरणेने एक दिवसाचे सामूहिक निरंकार उपवास व्रत धारण करून जैन धर्मियांच्या या चातुर्मास यज्ञात आपली आहुती अर्पण केली आणि सर्वधर्मसमूहाचा एक आदर्श समाजापुढे ठेवला.
मागील वेळच्या चातुर्मास प्रसंगी सुद्धा महासंघाच्या वतीने सुमारे २८ सभासदांनी एक दिवसाचे निरंकार उपवास व्रत केले होते. यावर्षी चातुर्मास प्रारंभ प्रसंगी ५२ सभासदांचा एक दिवसीय निरंकार उपवास व्रताचा संकल्प मराठा महासंघाचे वतीने करण्यात आला होता. त्यानुसार हा संकल्प पूर्ण करण्यात आला. सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान महासंघाच्या ५२ स्त्री-पुरुष सभासदांनी साध्वीरत्न परमपूज्य विचक्षणाजी महाराज साहेब एवम् संकल्प दर्शनाची महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प उपदेश घेऊन या व्रताची सुरुवात केली. याप्रसंगी मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड . पांडुरंग जगताप, इंदापूर तालुकाध्यक्ष श्री. राजकुमार मस्कर, महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. जयप्रकाश खरड व इंदापूर तालुका महिला अध्यक्ष डॉ. पद्माताई खरड यांनी जैन धर्मियांच्या उपवास व्रतसंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. या व्रतात महासंघाचे श्री. राजकुमार मस्कर सर, ॲड. श्री. पांडूरंग जगताप, श्री. छगनराव वाळके, डॉ. संकेत मोरे, सौ. जयश्री मोरे, डॉ . जयप्रकाश खरड, डॉ. सौ. पद्मा खरड, श्री. अशोकराव साळुंके, मराठा महासंघ भिगवण शाखेच्या महिला अध्यक्ष सौ. सुचेता साळुंके, श्री. सुभाषराव फलफले, श्री . दिनेश मारणे, सौ. लता मारणे , श्री . संतोष दाताळ, श्री. अभिनव वाघ, श्री . कुलदिपक ननवरे पाटील, सौ. मनीषा ननवरे, सौ. राजश्री गोरख ननवरे, श्री. तुकाराम काटकर, श्री. धनाजी नलवडे, श्री. भरत मोरे साहेब, सौ. संगीता मोरे, श्री. भरत ननवरे, श्री. सचिन विठ्ठलराव जाधव, श्री. सुहास गलांडे, डॉ. माधवराव नाईक- निंबाळकर, श्री. अनिल गोरख गलांडे, सौ. उर्मिला गलांडे, श्री. उमेश दिडवळ, श्री. विकास नाना वाघ, श्री. अर्जुन (बापू) शिरसट, श्री प्रशांत ढवळे, श्री. किरण लंगोटे, सौ. राणीताई लंगोटे, श्री. अर्जुन मिंढे, श्री. शरद जगदाळे, सौ. रोहिणी जगदाळे, श्री. दत्ता जाधव, सौ. सोनाली रामचंद्र कदम, श्री. सुनील एकाड (मेडीकल स्टोअर्स भिगवण), कोंचीकोरवे समाजाचे श्री. सुरेश तात्या पवार यांचेसह एकूण ५२ जणांनी आपला सहभाग नोंदविला. या व्रताची समाप्ती भिगवण येथील वर्धमान श्वेतांबरवाशी जैन स्थानक येथे रविवार दिनांक १०/११/२०२४ रोजी दुसरे दिवशी पारण्याने झाली. *या पारण्याचे नियोजन गेली वीस वर्षापासून नियमितपणे एकासन उपवास व्रत करणाऱ्या ८२ वर्षीय श्रीमती पद्माबाई गौतमचंद रायसोनी त्यांनी दिलेल्या दानराशीतून करण्यात आले होते*