ग्रामीण विकासाला चालना हीच सहकार महर्षीना आदरांजली.- डॉ प्रमोद गावडे

बातमी Share करा:

 म्हसवड : सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा साहेब) यांच्या जंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदरणिय आप्पा साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन युवा नेते लूनेश वीरकर, डॉ विलास सावंत, राजू पिसे, पै पोपट रुपनवर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्था मजबूत करण्यासाठी शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ग्रामीण भागात सहकारा ची चळवळ वाढविण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे स्व जयवंतरावजी भोसले आप्पा साहेब यांच्या विचारांची आपण कृतीतून पाठराखण केली पाहिजे असे प्रतिपादन डॉ प्रमोद गावडे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
                                     या जयंती निमित्त जय हनुमान तालीम मंडळ म्हसवड येथील खेळाडूंना फळे वाटप कार्यक्रम, तसेच गरजू शेतकरी आणि मेंढपालाना कर्ज वाटप करण्यात आले.
      या कार्यक्रमाला सौ सुनंदा सावंत मॅडम, जयश्री साठे, सुनीता खाडे, जिजबा तांदळे, किरण पुकळे, वैभव गायकवाड, राजेंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!