रोटरी क्लब ऑफ उंब्रज ची पोलिओ रॅली.
व्हिजन २४तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज:-प्रतिनिधी
२४ ऑक्टोबर* हा *जागतिक पोलिओ दिवस* म्हणून ओळखला जातो. या दिवसाचे औचित्य साधून *रोटरी क्लब ऑफ उंब्रज, रोटरॅक्ट क्लब ऑफ उंब्रज, आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज* यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिओ जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
रोटरी इंटरनॅशनल च्या माध्यमातून आज जगातून पोलिओ हद्दपार करण्याचे कार्य केले जात आहे. आज जगातून जवळपास पोलिओ नाहीसा झाला आहे परंतु आपल्या शेजारील देशात अजूनही पोलिओ चे रुग्ण आहेत, इथून पुढे पोलिओ चा एक ही रुग्ण राहू नये हा रोटरी चा ध्यास आहे आणि म्हणून पोलिओ जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष रो. विश्वनाथ केंजळे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व रो. श्रेया खंडागळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी रोटरॅक्ट क्लब चे अध्यक्ष रोटरॅक्ट युवराज पाटील, प्रोजेक्ट चेअरमन रो. साहेबराव कदम, रोटरी क्लब चे सर्व पदाधिकारी ,सदस्य, रोटरॅक्ट सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी,आणि आशा सेविका उपस्थित होत्या. या वेळी पूर्ण गावातून पोलिओ जनजागृती रॅली काढण्यात आली सांगता छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली.

