राष्ट्रीय महामार्गावरील दरोडा: सातारा जिल्हा पोलीस दल व पुणे ग्रामिण जिल्हा पोलीस दलाने सदरचा गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस : गुन्हयात वापरलेल्या साधनांसह एकूण २४ लाख, ७२ हजार, ८२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
व्हिजन २४ तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
सादिक शेख ( पोलीस टाइम्स रिपोर्टर)
गोंदवले खुर्द:
सातारा जिल्हा पोलीस दल व पुणे ग्रामिण जिल्हा पोलीस दलाने नमुद राष्ट्रीय महामार्गावरील दरोडया सारखा
गंभीर स्वरुपाचा गुन्हयातील एकूण ९ अज्ञात आरोपींना निष्पन्न करुन सदरचा गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस
आणून गुन्हयात चोरीस गेलला व गुन्हयात वापरलेल्या साधनांसह एकूण २४, ७२,८२० /- रुपये किमतीचा मुद्देमाल
हस्तगत करण्यात यश प्राप्त झाले आहे.
सविस्तर असे
दि.२७/०५/२०२३ रोजी रात्रौ १२.१० वा. च्या सुमारास काशिळ ता. जि. सातारा गावचे हद्दीत काशिळ गावचे हायवे ब्रिजवर फिर्यादी यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम. एच. ४३ बी.पी ८४२७ हिस ९ अज्ञात इसमांनी त्यांच्या ताब्यातील इनोव्हा कार व दोन मोटार सायकलवर येवून इनोव्हा कार बोलेरो गाडीस आडवी मारुन नमुद आरोपींनी फिर्यादी व त्यांचे सोबत असणारे इसमाचे तोंडावर स्प्रेचा फवारा मारुन फिर्यादी यांना गाडीचे खाली उतरवून फिर्यादी यांच्या ताब्यातील १७,६२,००० /- रुपये किमतीचे ११० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व १७ किलो चांदीचे दागिणे जबरीने चोरी करुन घेवून गेले म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरुन बोरगाव पोलीस ठाणे गु.र.नं.२००/ २०२३ भादविक ३९५, ३४१, ३३६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा. . सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्या सुचनेप्रमाणे . समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, . बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर . समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सदरच्या गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत माहिती प्राप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या.
त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्वतंत्र तीन पथके तयार करुन त्यांना गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकाने सर्व प्रथम घटनास्थळाची पाहणी केली, पाहणी केल्यानंतर आजूबाजूचे परिसरातील साक्षिदार, तांत्रिक विश्लेषन, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन नमुद गुन्हयातील काही आरोपी पुणे व काही आरोपी कोल्हापूर येथे गेले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी श्री अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे
ग्रामिण यांना नमुद गुन्हयाबाबत व आरोपींबाबत माहिती देवून अवगत केले व स्थानिक शाखेकडील तपास पथकांना आरोपींचा शोध घेण्याकरीता मदत करण्याकरीता कळविले.
दिनांक २९/०५/२०२३
तद्नंतर तपास पथकास तांत्रिक विश्लेषनाद्वारे पुणे येथे असणाऱ्या आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण यांना आरोपींच्या ठावठिकाण्याची माहिती देवून नमुद आरोपींना पकडण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास सहकार्य करण्याबाबत कळविले. स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस पथके आरोपींच्या मागावर असताना आरोपींची गाडी सोलापून हायवेने जात असल्याचे निदर्शनास येताच यवत पोलीस ठाण्याशी संपर्क करुन कासुर्डी टोलनाका येथे नाकाबंदी करुन यवत पोलीस ठाण्याचे स.पो.नि. स्वप्नील लोखंडे यांनी इनोव्हा कार व २
आरोपी पकडले. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण यांच्या मदतीने गुन्हयातील आणखी ३ आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील तपास पथकास यश आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १७,१९,८२०/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे तसेच गुन्हयात वापरलेले छयाचे पिस्टल, तीन चॉपर, इनोव्हा कार व मोबाईल हॅन्डसेट असा मिळून २४,७२,८२० /- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. नमुद आरोपींच्याकडे त्यांच्या साथिदारांबाबत सखोल विचारपूस केली असता त्यांनी उर्वरीत ४ साथीदार हे कोल्हापूर येथेमा. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली
सातारा जिल्हा पोलीस दल व पुणे ग्रामिण जिल्हा पोलीस दलाने नमुद राष्ट्रीय महामार्गावरील दरोडया सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हयातील एकूण ९ अज्ञात आरोपींना निष्पन्न करुन सदरचा गुन्हा २४ तासाचे आत उघडकीस आणून गुन्हयात चोरीस गेलला व गुन्हयात वापरलेल्या साधनांसह एकूण २४, ७२,८२० /- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश प्राप्त झाले आहे.
. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर, . अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामिण, . समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा,. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, वाभळे यवत पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे बोरगाव पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, अमोल माने, राकेश खांडके, मोहन नाचण, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, शिवाजी भिसे, विक्रम पिसाळ, स्वप्नील माने, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, रोहित निकम, स्वप्नील दौंड, संकेत निकम, शिवाजी गुरव यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई मधील सर्व अधिकारी
व अंमलदार यांचे सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर, . समीर शेखपोलीस अधीक्षक सातारा व . बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.