व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड… प्रतिनिधी राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेतील उज्वल यश पाहता क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे शैक्षणिक कार्य क्रांतिकारी असल्याचे प्रतिपादन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी म्हसवड येथे केले. कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज म्हसवड मधील राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार क्रांतिवीर संकुलात आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते. प्रमुख मान्यवर म्हणून संस्था सचिव सुलोचना बाबर, प्राचार्य विठ्ठल लवटे, प्राचार्य विन्सेंट जॉन, मुख्याध्यापक अनिल माने पूनम जाधव तसेच संस्था संचालक तात्यासाहेब औताडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सचिन ओंबासे म्हणाले आज सर्वत्र स्पर्धेचे जग आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध शालेय स्पर्धा परीक्षा तसेच नीट परीक्षेत उज्वल यश मिळवण्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन गरजेचे आहे. वेळेचे नियोजन,जिद्द, चिकाटी ठेवली तरच यशापर्यंत जाणं शक्य आहे. विद्यार्थी घडवल तसे घडतात त्यांना गरज असते योग्य मार्गदर्शनाची व सुयोग्य संस्काराची . विद्यार्थ्यांच्या उज्वल यशात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे जिल्हाधिकारी ओंबासे यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना सचिन ओंबासे म्हणालेविद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया शालेय स्तरावरच पक्का करणे गरजेचे असते. त्यावरच त्याचे शैक्षणिक उज्वल भविष्य अवलंबून असते. क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे कार्य दैदीप्यमान असून कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक,विद्यार्थी व पालक यांचा त्रिकोण योग्य प्रमाणात जुळला तर काय होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत मिळवलेले उज्वल यश होय. यावेळी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते आयुष पिसे, ओम साळुंखे, वेदिका भोसले, मोहित खाडे, प्रणव पवार, अदिती माने, शुभम काळेल, अथर्व कापसे, सुयश धनवडे, शुभम खाडे, धनराज भोसले, आशिष भागवत व ऋतुजा खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी जगताप यांनी तर उपस्थितांचे आभार प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी व्यक्त केले.
फोटो क्रांतिवीर संकुलात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व त्यांचा सत्कार करताना धाराशिव जिल्हाधिकारी सचिन ओंबासे