व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
रायगड
म्हसळा – सुशील यादव
८ मार्च जागतीक महीला दिनाच्या औचित्यानेरायगड जिल्हा परिषदेच्या सेवा निवृत्त आदर्श शिक्षिका शुभदा संतोष दातार यांचा म्हसळा तालुका शिवसेना उबाठा शहर युवा सेना संघटनेच्या वतीने त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेत यथोचित सत्कार करण्यात आला.
रायगड जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत म्हसळा तालुक्यात शुभदा संतोष दातार यांनी अध्यापनाचे काम अतिशय उत्तमरित्या पार पाडून अनेक विध्यार्त्यांचे जिवनात मोलाचे पैलु पाडले.त्यांचे कार्य काळात तालुक्यात दळणवळण करण्याकरिता अडीअडचणी असताना चिकाटीने काम करण्याची जिद्द त्यांच्या कार्यातून प्रामुख्याने दिसली आहे. रायगड जिल्हा शिक्षक संघटनेत त्यांनी महीला प्रतिनिधित्व केले आहे.सद्या त्या जिल्ह्यातील निवृत्त शिक्षक संघटनेत महीला प्रतिनिधित्व करत आहेत अशा कर्तबगार निवृत्त महीला शिक्षकेचा जागतीक महीला दिनाच्या निमित्ताने म्हसळा तालुका उध्दव बाळासाहेब ठाकरे युवासेनेतर्फे सन्मान कऱण्यात आला. सत्कार समारंभात तालुका प्रमुख सुरेश कुडेकर,युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे,शहरप्रमुख विशाल सायकर,युवासेना चिटणीस राहूल जैन,युवासेना शहर अधिकारी अजय करंबे,समीर लांजेकर,स्वानंद बोरकर,भालचंद्र दातार,कौशिक बोरकर उपस्थित होते.