रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने माण देशी महिला सहकारी बँकेच्या सौ. रेखा कुलकर्णी समवेत प्राथमिक नागरी सहकारी बँकांच्या (UCBs) सीईओंची घेतली भेट, 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी राज्यांच्या UCB फेडरेशनच्या प्रमुखांची आणि माण देशी महिला सहकारी बँकेच्या सौ. रेखा कुलकर्णी समवेत प्राथमिक नागरी सहकारी बँकांच्या (UCBs) सीईओंची घेतलीभेट, 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर (RBI), मा. श्री शशिकांत दास यांनी दि. १२ मे २०२३ रोजी नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड (NAFCUB), विविध राज्यांतील UCB च्या निवडक फेडरेशन्स आणि निवडक UCB चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीला श्री एम. राजेश्वर राव, डी. जी. कार्यकारी संचालक श्री एस सी मुर्मू श्री सौरव सिन्हा, श्री जयंती कुमार दास, श्री नीरज निगम यांच्यासह आरबीआयचे काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गव्हर्नरांनी त्यांच्या प्रास्ताविक भाषणात तळागाळात बँकिंग सेवा पुरवून आर्थिक समावेशन आणि आर्थिक वाढीला पाठिंबा देण्यासाठी UCBS द्वारे बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची कबुली दिली. ते पुढे म्हणाले की RBI मजबूत, सशक्त आणि लवचिक UCB क्षेत्रासाठी वचनबद्ध आहे आणि त्यासाठी सर्व भागधारकांनी सहकार्याच्या भावनेने एकत्र काम करण्याची गरज आहे. त्यांनी UCBs आणि त्यांच्या फेडरेशन्सना ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन प्रशासन आणि जोखीम व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी योग्य व्यावसायिक धोरणे स्वीकारण्याचा आणि त्यांचा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आणि त्यांच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी योग्य तंत्रज्ञान उपाय शोधण्याचा सल्ला दिला.
नागरी सहकारी बँकांना लागू होणाऱ्या नियामक आणि पर्यवेक्षी बाबींबाबत सहभागींनी त्यांच्या नियोजित योजना आणि सूचना शेअर केल्या. स्थायी सल्लागार समितीच्या (SAC) बैठका यापुढे वर्षातून एकदा न घेता सहा महिन्यातून एकदा घेतल्या जातील, असा निर्णय घेण्यात आला. RBI एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करेल जो नागरी सहकारी बँकांशी संबंधित सर्व जारी केलेल्या संपर्काचा एकमेव बिंदू असेल आणि नियुक्त केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी त्रैमासिकरित्या औपचारिक संवाद साधला जाईल.
या बैठकीमध्ये चार प्रकारच्या नागरी सहकारी बँका व त्याचे CEO होते. आणि दुर्बल घटकांना लघु पतपुरवठा करणाऱ्या बँकांमध्ये माण देशी महिला बँकेला निमंत्रित केले होते. आणि urban बँकांच्या काय काय समस्या आहेत व त्यांच्याकडे अजुन नवीन काय suggestions आहेत याबाबत चर्चा झाली यामध्ये सौ रेखा कुलकर्णी यांनी सदर केलेल्या महत्वाच्या मुद्द्यांमध्ये माणदेशी महिला बँकेची १ घरपोच आर्थिक सेवा अंतर्गत Business Correspondence सेवा हि फक्त ३० किमी वर मर्यादित न ठेवता ती वाढवून मिळावी. 2. दुर्बल घटकांना कर्ज देताना महिलां व कारागीर यांची फक्त १ लाखाची मर्यादा वाढविण्यात यावी, 3. सोनेतारणासाठी असलेली bullet Paymentची मर्यादा 2 लाखापासून ५ लाख करण्याबाबत, 4. अग्रक्रम क्षेत्रासाठी असलेली घर तारण कर्जाची २५ लाखाची मर्यादा वाढवुन मिळण्याबाबतचा मुद्दा मांडला गेला. इतर नागरी बँकांनी देखील या मुद्द्यांचे समर्थन केले. माण देशी महिला बँक राबवत असलेल्या आर्थिक साक्षरता मिशन साठी वापरात असलेल्या Financial Modules सौ. कुलकर्णी यांनी बैठकीत सादर केले. त्याबाबतीत RBI च्या Financial Inclusion Department ला पाठवुन ते RBI कडून कशाप्रकारे वापरात येतील यावर विचार विनिमय करण्यात येईल.
या बैठकीत RBI Central बोर्ड चे संचालक श्री सतीश मराठे, NAFCUB चे अध्यक्ष श्री ज्योतिन्द्र मेहेता, MUCBF चे चेअरमन श्री अजय ब्राम्हेचा, तसेच तामिळनाडू, उत्तर भारत, व तेलंगाना अर्बन फेडरेशन अध्यक्ष व वरिष्ठ संचालक उपस्थित होते. तसेच चार नागरी सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते त्यामध्ये माण देशी महिला सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रेखा सुनील कुलकर्णी या एकमेव महिला प्रतिनिधी म्हणुन उपस्थित होत्या त्यांनी मा. गव्हर्नर यांना महिलांनी तयार केलेली खण Bag दिली ज्यामध्ये कसुती कलाकारीचा स्टोल, रुमाल, मास्क व बँकेच्या २५ वर्षाची वाटचाल नमुद केलेली डायरी माणदेशीची आठवण म्हणुन दिली.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!