**भिगवन ट्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू करणेसाठी मुख्यमंत्री यांना साकडे **

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश मिंड
इंदापूर प्रतिनिधी

        भिगवण परिसरातील नागरिकांना महिला पुरुष व लहान मुलांच्या आरोग्यासाठी शासनाने भिगवन येथे ट्रॉमा केअर सेंटर चालू करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून मोठी बिल्डिंग बांधलेली आहे. सर्व प्रकारची साधनसामग्री उपलब्ध करून ड्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू होणे बाकी असताना राज्यकर्त्यांनी उद्घाटन करून ड्रामा केअर सेंटर चालू केलेले आहे परंतु प्रत्यक्षात सदरचे ड्रामा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू झालेले नाही.
        सदर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे तसेच सदर ट्रामा केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात उपकरणाची कमतरता आहे. तसेच ट्रामा केअर सेंटर मध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे अनेक सुविधांची सदर ठिकाणी अभाव असल्यामुळे परीसरातील नागरीकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.
           सदर बाबत भिगवन परिसरातील अनेक सामाजिक संघटनांनी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. शासनाने करोडो रुपये खर्च करून ट्रामा सेंटर चालू करून परिसरातील लोकांना याचा काहीही फायदा होत नसल्याने याबाबत अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. म्हणजेच शासनाने करोडो रुपये खर्च कशासाठी केलेले आहे. असा प्रश्न परीसरातील तरूणांना पडत आहे.

       त्यामुळे भिगवन परिसरातील सर्व सामाजिक संघटनांचे वतीने दहा दिवसांमध्ये सर्व सुविधांसह ट्रामा केअर सेंटर चालू न केल्यास मोठे जनआंदोलन उभारणार आहे. असे निवेदन शासनाला दिले होते त्यांनतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शासकीय पूजेला पंढरपूरला भिगवण मार्गे चालले असता मदनवाडी चौफुलां येथे शिवतेज ग्रुप चे अध्यक्ष रणजित जाधव ,मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ॲड पांडुरंग जगताप, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षेचे भूषण सुर्वे विशाल धुमाळ प्रहार फाउंडेशनचे हर्षवर्धन ढवळे समृद्धी प्रतिष्ठानचे संजय बंडगर विशाल बंडगर , कूंचीकोरवे समाज संघटना तसेच भिगवण मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर निवेदनाचा विचार करून तात्काळ प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले,.

            भिगवण ट्रॉमा केअर सेंटरच्या प्रश्नाबाबत माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झालेल्या असुन त्यांनी सविस्तर प्रश्न समजून घेऊन तात्काळ सोडवण्याचे आश्वासन दिलेले आहे थोड्या दिवसात सदरचे ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने चालू न झाल्यास सर्व सामाजिक संघटनांच्या व सर्व राजकिय पक्षाचे वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असले बाबत शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष रणजित जाधव यांनी सांगितले..


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!