म्हसवड नगरपरिषदेच्या गाळ्यांमध्ये मुळ मालकांनी पोट भाडेकरू ठेवले असून, त्यांच्याकडुन भरमसाठ भाडेपट्टा हे मालक घेत आहेत त्यावर पालिकेने ते गाळे ताब्यात घेवुन त्याचे फेर लिलाव करावेत या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील दत्तात्रय भोकरे या युवकाने तीन दिवसांपासुन पालिकेसमोर सुरु केलेले आमरण उपोषण अखेर मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी संबधित गाळेधारकांच्यावर ४५ दिवसांत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आमरण उपोषणाला बसलेले स्वप्नील भोकरे यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहिर केले
याबाबत पालिकेला दिलेल्या निवेदनात उपोषणकर्ते भोकरे यांनी म्हटले आहे की म्हसवड पालिकेने बांधलेल्या दुकान गाळ्यांमध्ये मुळ मालकांची दुकाने नाहीत त्याठिकाणी गाळे फोडून दोन गाळ्यांचा एक गाळा बनवून मूळ मालकांनी पोट भाडेकरू ठेवली आहेत यातुन ते मोठ्या प्रमाणावर भाडे घेत आहेत, पालिकेने अशा गाळ्यांचे करार रद्द करून ते गाळे ताब्यात घेवुन त्याचे फेर लिलाव काढुन ते सुशिक्षीत बेरोजगारांना द्यावेत अशी मागणी केली आहे. सदरच्या मागणीवरून भोकरे यांनी गत 3 दिवसांपासुन पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले होते, आज दि. 31 रोजी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी उपोषणकर्ते यांच्याबरोबर चर्चा करुन पालिकेच्या वतीने भोकरे यांना 45 दिवसांत नियमानुसार कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने भोकरे यांनी मुख्याधिकारी डॉ. माने यांच्या हस्ते रस घेत उपोषण सोडले. यावेळी,इंजि. चैतन्य देशमाने साहेब ,माजी नगरसेवक अंगुली बनसोडे, रणजीत सरतापे उपस्थित होते