व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी :
गोंदवले (ता. माण) येथील सुरज सुनील शिलवंत यांनी सावकारकीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात दहिवडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व फरार आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी गुन्हा घडल्यापासून फरारी होते, मात्र पोलिसांच्या संयुक्त टीमने त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यश मिळवले.
गुन्हा नोंद: दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३१७/२०२४ भादंवि कलम ३०६ सह अॅट्रॉसिटी आणि सावकारकी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज शिलवंत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी त्यांच्यावर सावकारकीच्या माध्यमातून सतत आर्थिक व मानसिक त्रास दिला होता.
फरार आरोपी: गुन्ह्यातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
1. आशुतोष आनंदराव कटटे (वय २३ वर्षे) 2. शिवतेज सुरेश कटटे (वय २४ वर्षे) 3. रामदास उर्फ राम मालोजी कटटे (वय ३४ वर्षे) हे तिघेही गोंदवले बु., ता. माण, जि. सातारा येथील रहिवासी असून गुन्हा घडल्यापासून फरारी होते. पोलीसांची कारवाई: दहिवडी पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त टीमने तातडीने तपास करून आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली. या कारवाईचे नेतृत्व सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
या अगोदर दोन आरोपींना अटक करण्यात आलेली होतीआज उर्वरित तीन जणांना अटक करून माननीय न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर केले जाणार आहे
संयुक्त टीम: या यशस्वी कारवाईत सहभागी अधिकारी आणि अंमलदार:
1. अक्षय सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक 2. रामचंद्र तांबे, पोलीस हवालदार 3. रवींद्र बनसोडे, पोलीस हवालदार 4. गणेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल
नागरिकांमधील प्रतिक्रिया: पोलीसांच्या या जलद आणि परिणामकारक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेतून योग्य शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.