अतिवृष्टी बाधितांना दिलासा — शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युवाशक्तीतर्फे यशराज देसाईंचा सामाजिक वाढदिवस उपक्रम

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी)

माण-खटाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात शासनाच्या मदतीसोबतच *शिवसेना (एकनाथ शिंदे गट)च्या वतीने सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आणणारा उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना नेते आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचे चिरंजीव यशराज दादा देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त “जनतेसोबत साजरा वाढदिवस” या संकल्पनेतून यशराज देसाई युवाशक्ती तर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत म्हसवड, विरकरवस्ती, पानवन, वडूज परिसरातील अतिवृष्टी-पुरग्रस्त शेतकरी, कामगार, आणि गरीब कुटुंबांना अन्नधान्य, तेल, साखर, डाळी, दिवाळीतील गोडधोड साहित्य असलेले “साहाय्य किट” वितरित करण्यात आले. दिवाळीचा सण संकटग्रस्त कुटुंबांनाही आनंदात साजरा करता यावा हा यामागचा हेतू होता.

या कार्यक्रमास शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यात बाळासाहेब मुलाणी (तालुकाप्रमुख),बंडोपंत मंडले ( उप तालुकाप्रमुख) अंकुश नलावडे (संघटक), हनुमंत राजगे (माण ता.युवासेना प्रमुख), वैभव गुरव (शहर प्रमुख), अनिल मासाळ (युवासेना शहर प्रमुख ), बंडोपंत मंडले ( उपतालुकाप्रमुख), सुभाष काळंगे (उपतालुकाप्रमुख) आदी मान्यवरांचा समावेश होता.

यावेळी बोलताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की “शिंदे साहेबांनी दिलेली समाजसेवेची शिकवण म्हणजेच खरी युवाशक्तीची प्रेरणा आहे. गरजूंसाठी पुढे जाणे हेच आमचे राजकारण आहे.”

स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत म्हटले की “देसाई कुटुंब व शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्ते जनतेच्या सुख-दुःखात नेहमी सोबत असतात” — याचे हे उत्तम उदाहरण आहे.

या मदतकार्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) च्या सामाजिक कार्याचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे आणि यशराज दादा देसाई यांच्या नेतृत्वाखालील युवाशक्ती ही खरी समाजाभिमुख शक्ती ठरली आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *