री – कनेक्ट विथ आर्ट कार्यशाळा उत्साहात संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी

       सातारा येथील गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे चित्रकलेचे शास्त्रशुद्ध उच्च कला शिक्षण सन-1997 पासून देणारे कला महाविद्यालय सातारा (पाटखळ माथा ) येथील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेवर आधारित -री कनेक्ट विथ आर्ट या दुसऱ्या निवासी तिन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,
       या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ,मुंबई येथील निवृत्त प्राध्यापक श्री मोग्गलान श्रावस्ती – मुंबई यांनी या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या 12 माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये ” विचार -चित्र ,चित्र – मांडणी ” या दृष्टीने एका चित्राचा निर्मिती प्रवास टप्याटप्याने कसा असतो किंवा तो कसा करावा या दृष्टीने विविध अंगाने चर्चा , चित्र प्रात्यक्षिके व चित्रकृती युक्त मार्गदर्शन करण्यात आले

      यामध्ये सहभागी चित्रकार -विद्यार्थी – महेश जाधव, विवेक जाधव,सादिक शेख, सचिन कदम, पुंडलीक देवकर, सिध्दांत पिसाळ, महानंदा ढोणे – खांडेकर, गीता छाडवा – मामणीया, रोहिणी पाटील – यादव, निलाक्षी घोणे – आवळे, मनिषा मोरे – काळे, मनिषा डफळे – जाधव ,यांनी मार्गदर्शनानुसार आप-आपली स्वनिर्मित चित्रनिर्मिती केली, भविष्यात या चित्रकृतींचे प्रदर्शन भरवण्याचा मानस आहे .यामध्ये कला महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. विजयकुमार धुमाळ यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले. गणेश ढाणे ,स्मिता ढाणे व कुटुंबीय तसेच अभय जाधव यांचे सहकार्य लाभले.

     कार्यशाळेमध्ये सहभागी चित्रकार कलावंतांना सहभाग प्रमाणपत्र मार्गदर्शक चित्रकार मा.श्री.-मोग्गलान श्रावस्ती यांचे हस्ते प्रदान करण्यात आले, ही कार्यशाळा दि. 3 O, 31 मे व O1 जून 2O24 रोजी कसबे बामणोली -सातारा येथे पार पडली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!