रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द प्रशालेत पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त सभेचा कार्यक्रम संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
गोंदवले खुर्द :
रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द प्रशालेत पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त सभेचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोंदवले खुर्द येथील प्रथम नागरिक सरपंच . सौ. सिंधूताई बाळासाहेब गाढवे यांनीभूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून  स्वाती धोंगडे मॅडम पी. एस. आय दहिवडी पोलीस स्टेशन दहिवडी उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये मा. निलम रासकर मॅडम (पोलीस नाईक) दहिवडी पोलीस स्टेशन दहिवडी , स्थानिक स्कूल कमिटी सदस्य .ॲड. श्री.प्रभाकर कारंडे (भाऊ)मधुकर मोरे (आबा), . राजेंद्र कदम, पत्रकार.फिरोज तांबोळी,. संदिप जठार, पालक सौ.वैशाली कुलकर्णी, सौ.मंगल खलाटे, सौ.आशा कदम,.विजयकुमार अवघडे सर उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे .स्वाती धोंगडे मॅडम तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांच्या शुभहस्ते डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
 विद्यालयातील विद्यार्थिनींनी विद्यालयातील कला शिक्षक. सादिक शेख सर यांचे मार्गदर्शनाखाली उपस्थीत मान्यवरांना स्वागत गीताने मंत्रमुग्ध केले. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक . अशोक उगलमोगले यांनी प्रास्ताविक केले.विद्यालयातील विद्यार्थीनी कु. प्रितम फाळकेने अण्णांचे बालपण व शैक्षणिक कार्य या विषयावर मनोगत व्यक्त केले. पालक .दादासाहेब अवघडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक . नदाफ सरांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे . स्वाती धोंगडे मॅडम (निर्भया पथक प्रमुख)यांनी विद्यार्थ्यांना कायदे विषयक माहिती दिली.स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले.तसेच मी स्वतः कशी घडले ? या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले. निलम रासकर मॅडम यांनीही विद्यार्थी व विद्यार्थिनींना लैंगिक शोषण या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनिंनी इंडियन ट्यालेंट ऑलंपियाड मध्ये सुवर्ण पदक मिळवल्यामुळे, तसेच राज्यस्तरीय युनिफाईट कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्यामुळे, इयत्ता पाचवी विद्यार्थी  शिष्वृत्तीपात्र झाल्यामुळे, इयत्ता आठवी विद्यार्थीनी सारथी शिष्वृत्तीधारक झाल्यामुळे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण सोहळा करण्यात आला.ओकिनावा मार्शल आर्ट ग्रुप चे मास्टर . विजयकुमार अवघडे सर (ब्लॅक बेल्ट 2 nd दान)यांनी स्वसंरक्षण करण्यासाठी प्रात्यक्षिकांद्वारे कराटे प्रशिक्षण द्वारे विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.विद्यालयाचे कलाशिक्षक. सादिक शेख सर यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार  दिनेश जाधव सर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयाचे  मुख्याध्यापक . नदाफ एन.डी.सर यांच्या मार्गदर्शनाखाली .सादिक शेख सर, . गोपीनाथ घोडके सर . अशोक उगलमोगले सर, . दिनेश जाधव सर,. प्रमोद माने सर,सौ.शेडगे मॅडम,शिक्षकेतर कर्मचारी विद्यालयाचे लेखनिक  दयानंद जगदाळे सर, . प्रदीप घाटगे ( आण्णा ),श्रीमती कलावती अवघडे मॅडम विद्यार्थी- विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकर्याने डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा
यशस्वीपणे संपन्न झाला. स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापण समिती, शाळा व्यवस्थापण विकास समिती, विद्या समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, माता – पिता पालक,विकास मंडळ मुंबई ( गोंदवले खुर्द ), ग्रामपंचायत,सरपंच, उपसरपंच, सदस्य, गोंदवले खुर्द ग्रामस्थ यांच्या शुभेच्छा लाभल्या

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!