रयत शिक्षण संस्थेच्या उत्कर्षामध्ये पवार साहेबांचे योगदान मोलाचे-ग्रामिण साहित्यिक अजित काटकर

बातमी Share करा:

म्हसवड :
       रयतच्या  उत्कर्षामध्ये पवारसाहेबांचे  मोलाचे योगदान आहे असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक अजित काटकर यांनी  रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल खडकी पाटोळे या विद्यालयात शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित कृतज्ञता सप्ताहाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मचाले सर होते.
सहा डिसेंबर ते बारा डिसेंबर हा कृतज्ञता सप्ताह म्हणून विद्यालयात साजरा करण्यात आला
    यावेळी अजित काटकर यांनी म्हणाले की पवार साहेबांचे राजकिय,सामाजिक व क्रिडा क्षेत्रातील कार्य सद्यस्थितीत या क्षेत्रात काम करणा-या सर्वांसाठी अनुकरणीय असेच आहे.पवारसाहेबांचे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी, प्रश्नाचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना प्रिय असेच आहे,वयाची ८२ वर्षे पूर्ण करूनही एखाद्या तरुणाला लाजवेल अशी कार्यक्षमता त्यांनी जोपासली आहे. राज्य,राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय समस्यांचे योग्य निरसन करुन मार्गदर्शन करण्यामुळेच आज ते या स्थानी पोहोचले आहेत. सुमारे ६८० शाखा असणा-या रयतसारख्या शिक्षण संस्थेचा उत्कर्ष होण्यामध्ये पवारसाहेबांनी आपले मोठे योगदान दिले आहे.
   या कृतज्ञता सप्ताह मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा व क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन केले होते. बारा डिसेबर ला सप्ताहाचा समारोह साजरा करण्यात आला यामध्ये  सप्ताह या कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपशिक्षक  पाडवी सर यांनी केले
     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजित काटकर यांनी आपल्या भाषणात विद्यालयाची प्रगती सर्व शिक्षक व विद्यालयाचे मुख्याध्यापक घेत असलेल्या कष्टाचे कौतुक केले.
         या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक  राजगे सर यांनी केले कार्यक्रमासाठी खडकी परिसरातील सर्व विद्यार्थी, पालक सर्व शिक्षक उपस्थित होते

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!