रत्नत्रय पतसंस्था तळागाळातील गोरगरिबांच्यासाठी आधारवड : नितीन दोशी
म्हसवड
रत्नत्रय पतसंस्था करीत असलेले कार्य कौतुकास्पद असुन ही पतसंस्था, सामाजिक बांधिलकी जपत तळागाळातील गोरगरिबांना व्यवसायासाठी कर्ज देऊन त्यांचा आधारवड ठरली असल्याचे प्रतिपादन म्हसवड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्था म्हसवडचे चेअरमन श्री. नितीन दोशी यांनी केले.
सदाशिवनगर येथील रत्नत्रय पतसंस्थेच्या कार्यालयात श्री. नितीन दोशी यांच्या शुभहस्ते रत्नत्रय दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळेस त्यांनी रत्नत्रय पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करून संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी रत्नत्रय परिवाराचे संस्थापक मा.श्री. अनंतलाल (दादा) दोशी, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन व सदाशिवनगर ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच मा. श्री. विरकुमार दोशी, व्हा. चेअरमन श्री. संजय गांधी, रत्नत्रय इंग्लिश स्कूलचे चेअरमन श्री. प्रमोद दोशी, पुरंदावडे गावचे माजी सरपंच देवदास ढोपे, हरी पालवे, येळीवचे उपसंरपच शिवराज निंबाळकर, रत्नत्रय पतसंस्थेचे संचालक संजय गांधी, जगदीश राजमाने, रामदास गोफणे, सतीश गांधी, अजय गांधी, सोमनाथ राऊत, सचिव ज्ञानेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नत्रय पतसंस्थेच्या कार्यालयात दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी
बोलताना प्रमोद दोशी यांवी संस्थेमार्फत ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सविधा त्यामुळे सभासदांचा संस्थेवरील असलेला विश्वास परिसरातील छोट्या व्यावसायीकांना सुलभरितीने कर्ज मिळावे या उद्देशाने संस्थेची केलेली स्थापना याविषयी सखोल माहिती सांगुन आर्थिक व्यवहाराबरोबर ही संस्था अनेक सामाजिक कार्यही करत असल्याचे सांगीतले . गत १८ वर्षापासून ही संस्था जाहिरातदारांच्या सहकार्याने दिनदर्शिका काढत आहे त्या सर्व जाहिरातदारांचे आभार व्यक्त करुन सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या
त्यानंतर श्री. नितीन दोशी हे माण तालुका खादी ग्रामोद्योग संस्था संचालक पदी निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार रत्नत्रय परिवाराचे संस्थापक श्री. अनंतलाल (दादा) दोशी यांचे शुभ हस्ते करण्यात आला. त्यानंतर मा.श्री.विरकुमार दोशी हे सदाशिवनगर गावच्या सरपंच पदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल श्री. नितीन दोशी यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.