विभागीय टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेत रत्नागिरी व सातारा जिल्ह्याचे वर्चस्व.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड…प्रतिनिधी
म्हसवड येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेत रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या संघाने उत्कृष्ट खेळी करून आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याने त्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


क्रीडा व युवक कल्याण संचालनालय पुणे तसेच क्रीडा अधिकारी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 14 व 17 वयोगट मुले व मुली कोल्हापूर विभागीय टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांच्या हस्ते झाले तर विजयी खेळाडूंना म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना ए.पी.आय. सखाराम बिराजदार म्हणाले शालेय स्पर्धेत जय पराजय पेक्षा स्पर्धेतील सहभाग महत्त्वाचा आहे. अभ्यासाबरोबर खेळायला सुद्धा महत्त्व द्या. खेळातूनच भारतरत्न सचिन तेंडुलकर घडला. यशस्वी खेळाडूंची बिराजदार यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना विश्वंभर बाबर म्हणाले माण तालुक्यातील सुकन्या ऑलम्पिक पटू ललिता बाबर खेळातूनच उपजिल्हाधिकारी झालेली आहे.


कोल्हापूर विभागीय टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच या विभागांतर्गत च्या महानगरपालिकेचे संघ सहभागी झाले होते.
14 वर्षे वयोगटात मुले सातारा संघाने प्रथम क्रमांक तर सांगलीच्या मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय क्रमांक सातारा संघाने मिळविला.
17 वर्षे वयोगटात मुले संघ प्रवर्गात रत्नागिरी प्रथम , सातारा आत्मगिरी विद्यालय म्हसवड द्वितीय व सांगली मनपा नेतृत्व क्रमांक मिळविला.
या स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, तांत्रिक समितीचे नामदेव शिंदे, प्राचार्य विन्सेंट जॉन, मुख्याध्यापक अनिल माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडाशिक्षक चंद्रकांत तोरणे, तुकाराम घाडगे,पांडुरंग भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले तर पंच म्हणून सुमित कांबळे, आकाश कर्वे, विजय गोळे, संदेश साळुंखे यांनी काम पाहिले.
कोल्हापूर विभागीय टेनिस क्रिकेटस्पर्धेतील विजेत्या संघाला बक्षीस वितरण करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार व विश्वंभर बाबर


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!