ढाकणीचे ग्रामदैवत श्री सिध्दनाथाचा रथोत्सव उत्साहात पार पडला
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सचिन मंगरुळे
म्हसवड प्रतिनिधी :
ढाकणी, ता. माण येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
ढाकणी (ता. माण) येथील चैत्र अष्टमीला ग्रामदैवत श्री सिद्धनाथाची यात्रा भरते. यात्रेचा मुख्य दिवशी रथोत्सव असतो दुपारी चारच्या सुमारास मंदिरासमोरून रथ नगरप्रदिक्षणेला मार्गस्थ झाला.
सायंकाळी सातच्या सुमारास रथ नगरप्रदिक्षणा पूर्ण करून मंदिराजवळ आला. यावेळी रथावर भाविकांनी गुलाल, खोबऱ्याची उधळण करत सिद्धनाथाचा जयघोष केला.. रथ हातांनी ओढत भाविकांनी नाथाच्या नावाने ‘चांगभलं’च्या जयघोष करीत रथ मार्गस्थ केला. भाविकांनी यावर नवसाची नारळाची तोरणे, पैशाच्या माळा अर्पण केल्या होत्या. रथापुढे बगाड व नाथांची पालखी तसेच नाथाची सासणे असतात. रथोत्सवास हजारो ग्रामस्थ भाविक उपस्थित होते. दरम्यान, यात्रा कमिटीच्या वतीने रथाच्या दुसऱ्या आज मंगळवारी जंगी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो रुपयांच्या कुस्ती लावण्यात आल्या होत्या.
ढाकणी ता. माण येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ यात्रेसाठी पाराखाली मेवा, मिठाई, खेळणी, बांगडी, नारळ, हाॅटेल व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली होती.
चौकट – यात्रेनिमित्त गावोगांवच्या गजी मंडळांनी यात्रा स्थळी गजीनृत्य सादर केली. गजी पाहण्यासाठी अबाल वृध्द, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने दिवसभर पारावर
( यात्रा पटांगण ) ग्रामस्थ, पै पाहुण्यांनी गजबजून गेला होता.
रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवा यात्रा कमिटीच्या वतीने जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नामवंत मल्लांच्या हजारो रुपयांच्या कुस्त्यां लावण्यात आल्या होत्या. कुस्ती मैदान पार पाडण्यासाठी व यात्रेचे विविध कार्यक्रम पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी व समस्त ढाकणी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.