राष्ट्रीय समाज पक्षाच्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रभारींची नियुक्ती
व्हिजन २४ तास न्यूज
BY; Ahmad Mulla
म्हसवड :
आगामी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माळशिरस येथे राष्ट्रीय संघटक बाळासाहेब लेंगरे मामा यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश अध्यक्ष काशीनाथ नाना शेवते आणि मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत प महाराष्ट्र अध्यक्ष अ़ॅड. संजय माने, सातारा जिल्हा अध्यक्ष खंडेराव सरक, सोलापूर (पंढरपूर विभाग) जिल्हा अध्यक्ष रणजित सूळ, रासप नेते अ़ॅड राजाभाऊ वाघमोडे हजर होते. या बैठकीत माढा लोकसभा बांधणीसाठी या मतदारसंघांर्गत येणाऱ्या सह विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात आली.
१) माण विधानसभा--काशीनाथ शेवते,दादासाहेब दोरगे श्रीकांत देवकर
२)फलटण विधानसभा– खंडेराव सर भाऊसाहेब वाघ ३) माळशिरस विधानसभा– रणजित सूळ, संतोष ठोंबरे,
४) सांगोला विधानसभा–बाळासाहेब लेंगरे मामा, ज्ञानेश्वर (माऊली) सलगर,सोमा (आबा) मोटे,
५) माढा विधानसभा–पंकज देवकते ,गोरक वाकडे,म्हाळाप्पा खांडेकर
६) करमाळा विधानसभा –अ़ॅड. संजय,माने ,परमेश्वर पुजारी, अंगद देवकाते
अशाप्रकारे निवडी करण्यात आल्या आहेत. तरी वरील सर्व निवडणूक प्रभारी यांना सूचना आहे, आपण तात्काळ आपल्या विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या सर्व पदाधिका-यांशी संपर्क साधून /विचार विनिमय करून सदर विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या प्रत्येक जिल्हा परिषद गटातुन एक गट प्रभारी तसेच प्रत्येक पंचायत समिती गणातून एक गणप्रभारी आणि प्रत्येक नगर पालिका/नगर पंचायत मधून एक शहर प्रभारी १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत नियुक्त करावा.
या नवनियुक्त गट, गण आणि शहर निवडणूक प्रभारी यांची विधानसभा वाईज बैठक दिनांक १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ या दोन दिवसांत पार पडतील. यासाठी आपण तात्काळ नियोजन करावे असे . *बाळासाहेब लेंगरे मामा- राष्ट्रीय संघटक*
*काशीनाथ नाना शेवते- प्रदेश अध्यक्ष- महाराष्ट्र*
*ज्ञानेश्वर (माऊली) सलगऱ- मुख्य महासचिव महाराष्ट्र* यांनी बैठकीत नवनियुक्त प्रभारी यांना सुचना दिल्या