व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसळा – सुशील यादव म्हसळा शहरा नजिकच्या गावात माहिलेचे अश्लील फोटो सोशल मिडीयाच्या इंस्टाग्रामवर पाठवून विनयभंग केल्याची तक्रार म्हसळा पोलीसांनी दाखल केली आहे. पोलीसानी गुन्हा रजीस्टर क्रमांक २२ २०२४ भारतीय दंड विधान संहिता ३५४ (ड), ५०६,५०,९ सह तंत्रज्ञान आधिनियम ६६ ई प्रमाणे गुन्हा नोंद शुक्रवार दि.१५ मार्च रोजी दुपारी २ च्या दरम्यान केली आहे.
या प्रकरणी पोलीसानी आद्याप कोणाला अटक केली नसल्याचे समजते.आरोपीने त्याचे वेगेवळ्या ३ इंस्टाग्राम आयडीने महिलेच्या आयडीवर वारंवार अश्लील फोटो पाठवले होते या सर्व प्रकाराने महिलेच्या मनात लज्जा निर्माण झाल्याचे सूत्रानी सांगितले.आरोपीने हा प्रकार न थांबवता अन्य अश्लील फोटोंची माहिलेकडे मागणी केली.पुढे जाऊन त्याने फोटो न दिल्यास उपलब्ध असणारे अश्लील फोटो म्हसळयातील अन्य जास्त संखेने सहभागी आसलेल्या सोशल मिडीयावरील ग्रुपमध्ये शेअर करण्याची धमकी फिर्यादीला दिल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले.
गुन्ह्याचा तपास श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक रिकामे हे करीत आहेत.