क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त रणरागिणी संस्थेकडून अभिवादन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

फलटण, दि. — (प्रतिनिधी):
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने क्रांतीसूर्य यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समाजसुधारणेतील महान कार्याचा व स्त्रीशिक्षण, समता व सामाजिक न्यायासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अतुल शहा व इम्रान सय्यद, खजिनदार कैफ शेख, सचिव मारुती टकले तसेच संचालिका माया बनसोडे, सौ. प्रीती शहा, सौ. रझिया शेख व सौ. अनिसा सय्यद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून, उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शांचे स्मरण केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *