राजारामबापू हायस्कुलला कुमार केतकर यांच्या खासदार फंडातून २० लाख रुपये : रावसाहेबकाका पाटील
व्हिजन २४ तास न्युज (संपादक अहमद मुल्ला )
सादिक खाटीक
आटपाडी (प्रतिनिधी )
काँग्रेस आयचे राज्यसभेचे खासदार, ज्येष्ट पत्रकार, माजी संपादक कुमार केतकर यांनी त्यांच्या खासदार फंडातून २० लाख रुपयेचा निधी राजारामबापू हायस्कुल मधील संगणकीय प्रणाली विकसीत करण्यासाठी उपलब्ध करून दिल्याचे आणि यासाठी प्रशालेचे माजी विद्यार्थी एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेल मुंबईचे संपादक राजीव खांडेकर यांचे सहकार्य लाभल्याची माहीती श्री. भवानी शिक्षण संस्थेचे चेअरमन * रावसाहेबकाका पाटील* यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी या घोषणेचे स्वागत करून आनंद साजरा केला.
राजारामबापू हायस्कूल आटपाडी येथे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी * रावसाहेबकाका पाटील* बोलत होते.
विधानसभा गाजवेल असा अभ्यासू, कर्तृत्वसंपन्न कोणीही आटपाडी तालुकावाशीय आमदार व्हावा. अशीच आपली भावना असल्याचे *रावसाहेबकाका पाटील* यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोणतेही काम हलके, लहान, तुच्छ, कमी पणाचे असे असत नाही. कष्ट – श्रमाला प्रतिष्ठा देत सतत कार्यरत राहील्यास सर्वच क्षेत्रात यशस्वी होत जगणे आणि जगही कवेत घ्याल. अशा भावना आटपाडी तालुक्याचे ज्येष्ट नेते *शिवाजीरावतात्या पाटील** आणि तालुका दुध संघाचे तालुका अध्यक्ष * विष्णूपंत चव्हाण – पाटील* यांनी व्यक्त करून, *विद्यार्थी, * शाळेचा, संस्थेचा अनिवार्य घटक असतो . तसे शाळा, संस्थेच्या पदाधिकारी, शिक्षक,
कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याच्या परिवाराचा विश्वास आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहीजे . ज्ञानदान देताना सर्वस्व झोकून देत सेवा . बजावली पाहीजे. शिक्षक म्हणजे समाजाचा आदर्श आरसा ही पूर्वीची प्रतिमा पुन्हा उभी राहण्यासाठी शाळेच्या व्यतिरिक्तच्या जीवनात शिक्षकांनी समाजोपयोगी भूमिकेने समरस झाले पाहीजे. असे ही *शिवाजीरावतात्या पाटील- विष्णूपंत चव्हाण पाटील* यांनी यावेळी स्पष्ट केले.
जात, पात, वर्ण, उच्च, नीच, लहान, मोठा, अंध, अपंग अशा भेदांना तिलांजली देत परस्परांचे रक्त मानवाला जीवनदान देते हेच वास्तव प्रत्येकाने जीवन समृद्ध करण्यासाठी स्विकारावे . इन्सानियत, मानवता, समता बंधुत्वाची भावना जोपासावी असे स्पष्ट करून राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव * सादिक खाटीक* यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत ज्यांनी सर्वस्व झोकुन दिले ते स्वातंत्र्यसैनिक, जे हुतात्मा झाले, ते शहीद . त्या सर्वांना भारतरत्न, महाराष्ट्र भुषण गौरवावे. प्रत्येक खेडे, गाव, शहरामध्ये स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र निर्मितीचा इतिहास उभी करणारी अभ्यासिका आणि हुतात्म्यांच्या नाव – गाव स्पष्ट करणारा हुतात्मा गौरव फलक उभारावा . असे मत . व्यक्त केले.
* सादिक खाटीक* पुढे म्हणाले, प्रचंड प्रमाणात सौरउर्जा, पवनचक्क्या उभारून मोफत, सहजच उपलब्ध होणाऱ्या सुर्यप्रकाश आणि हवेला उपयोगात आणत, गावगाड्यांना आर्थिक सुबत्ता आणावी त्यामुळे शहरे मोकळा श्वास सोडतील आणि खेडे, गावे कोट्यावधींचे मालक बनतील आणि गावचा शहराकडे धावणारा लोंढा गावातच रोखला जाईल . * सर्व भारतीयांच्या जीवनात परिवर्तन आणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार स्त्रियांसाठी मोठे काम केले आहे. प्रत्येकाने जय शिवाजी, जयभीमच्या मंत्राने आपले जीवन भारून टाकावे.
स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तरीपर्यत मराठी माणूस देशाचा
स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तरीपर्यत मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला नाही. सदयस्थितीत सर्वात योग्य असणारे *शरदचंद्रजी पवार साहेब* पंतप्रधान झाल्यास खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा गौरव होईल. रावसाहेबकाका पाटील यांच्या आयुष्याचा उत्तरार्थ यशस्वी होण्यासाठी, ते मोठ्या पदाने सन्मानीत होण्यासाठी, आपण सर्वानी त्यांच्या पाठीशी उभे राहू या. अशाही भावना * सादिक खाटीक* यांनी व्यक्त केल्या.
प्रशालेचे सहशिक्षक, * दादासाहेब मोटे सर* यांनी सुत्रसंचालन करताना, ” सादिकभाई ! ” पवार साहेब पंतप्रधान व्हावेत असे बोललात, पण रावसाहेबकाका आमदार व्हावेत, याविषयी डायरेक्ट काही बोलला नाही, असे म्हणताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच्या वक्तव्याला हसत हसत दाद दिली .
प्रारंभी शिवाजीरावतात्या पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . त्यांच्याच हस्ते, शिष्यवृत्ती परिक्षेत मोठे यश . मिळविल्या बद्दल * कु. संस्कृती तळे* चा गौरव करण्यात आला .
यावेळी *भाजपाचे नेते आप्पासाहेब काळेबाग सर, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ट नेते विलासराव खरात, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, ज्येष्ट समाजसेवक रमेश टकले, बाळासाहेब चांडवले, सावंता जाधव माळी, नितीन डांगे, मुख्याध्यापक टी. डी . चव्हाण, एस. एल. पाटील, एम. आय. . साळुंखे, एस. एम. पाटील, ए. ए. जाधव, एम. आय. मुलाणी, एम. एस. सनदी, सौ. एम. एस. कोरवी, सौ. एस. एस. भोसले, एच. आर. चव्हाण, एस. व्ही. जाधव, सौ स्नेहल पाटील इत्यादी अनेक जण उपस्थित होते. शेवटी एम. बी. देवकर* यांनी आभार मानले.