रायगडात मोदी लाटेच्या विरोधात सुनामी सारखे मतदान होणार –

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
रायगड

सुशील यादव

म्हसळा -प्रतिनिधी

मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प – उद्धव ठाकरे

         आपण हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत. नुसत मोदींच्या विरोधात नाही,मी व्यक्तीच्या विरोधात नाही आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत.रायगडमध्ये मला नाही वाटत जास्त काही प्रचार करण्याची गरज आहे.कारण गेल्या वेळेला एवढ करून सुद्धा रायगड ताठ मानेन मोदी विरोधात उभा राहिला होता.आता तर मोदी लाटेच्या विरोधात सुनामी सारखं मतदान होणार असल्याचे प्रतिपादन उध्दव ठाकरे यांनी म्हसळा येथील विराट जनसंवाद मेळाव्यात केले.

      आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर रायगड जिल्हा दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जनसंवाद मेळावा म्हसळा दिघी रोड येथे घेण्यात आला या मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,विधान सभेतील गटनेते आम. अजय चौधरी,माजी खासदार अनंत गीते,शिवसेना नेते आम.भास्कर जाधव,माजी आम.विनोद घोसाळकर,किशोर जैन,मिलिंद नार्वेकर,जिल्हा प्रमुख अनिल नवगणे,उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के,क्षेत्रसंघटक रविंद्र लाड,तालुका प्रमुख सुरेश कुडेकर,नगरसेविका राखी करंबे,अजय करंबे,श्रीवर्धन तालुका प्रमुख सुजित तांदळेकर,ऍड.फकीर मोहंमद ठाकूर,जिल्हा प्रमुख सुरेश म्हात्रे माजी आम. तुकाराम सुर्वे,युवासेना प्रमुख कौस्तुभ करडे,अनिल काप,गजानन शिंदे,दीपल शिर्के आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

        याप्रसंगी आम.भास्कर जाधव यांनी सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरची लवाद म्हणून नेमणूक केली तो लवाद नाही तर लबाड निघाला.सर्वांनी उद्धव ठाकरेवर अन्याय केला परंतू ही जनतेची प्रचंड तोफ बघून जनता अजूनही उद्धव ठाकरेंच्या मागे खंबीर उभी असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. गद्दारांचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नसल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.आगामी लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देणाऱ्यांना मग नितीश कुमार का लागतात ? असे म्हणतच आजच्याच वर्तमानपत्रात माजी मुख्यमंत्री सोरेन यांना अटक तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीनचिट अशा बातम्या छापून आल्या. तेव्हा जो सोबत येईल तो क्लीन आणि जो विरोधात असेल त्याला अटक अशी रणनीती भाजपची असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.रायगडकरांना मी जरा वेगळ्या पद्धतीने धन्यवाद देतोय. कारण, त्यावेळीसुद्धा रायगड मोदी लाटेत वाहून गेला नाही.विरोधात मतदान केलं होत.आता रायगडमधून जो निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला,पण माझा रायगड तसाच आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी खासदार सुनील तटकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. आता रायगडकर खुश झाले आहेत. कारण त्यांना जे पटलं नव्हतं ते त्यांनी तेव्हा दाखवलं होतं. आता तर आपण हुकूमशाहीच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत. नुसतं मोदींच्या विरोधात नाही, मी व्यक्तीच्या विरोधात नाही आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत.रायगडमध्ये मला नाही वाटत जास्त काही प्रचार करण्याची गरज आहे.कारण गेल्या वेळेला एवढं करूनसुद्धा रायगड ताठ मानेनं मोदी विरोधात उभा राहिला होता.आता तर मोदी लाटेच्या विरोधात सुनामीसारखं मतदान होणार आहे. असाही विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.मी मुख्यमंत्री आसताना कोरोना,तोप्ते, निसर्ग वादळात शेतक-यांना मदत केली,संकट आले आसताना पंतप्रधान फिरकले नाहीत आता महाराष्टाच्या वा-या करत आहेत, मत पाहीजे तेव्हा मेरे प्यारे देश वासीयो नंतर मात्र चिरडुन टाकायचे.राम मंदीर झाला मला आनंद आहे, परंतू प्रभू रामचंद्र हि मोदींची किंवा भाजपची खाजगी मालमत्ता नसून देशातील सर्व रामभक्तांचा आहे.भाजपच्या,आरएसएस च्या कार्यकर्तानी डोळे उघडा ही लोकशाही विरुध्द हुकुमशाही लढाई आहे.मला पंतप्रधान पदाचे स्वप्न पडत नाही मला दिसतोय ती भारतमाता,माझा देश मला सविधान वाचवयाचे आहे असे उध्दव ठाकरे म्हणाले.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलेल्या अर्थसंकल्प मध्ये महिला, गरीब, तरुण, शेतकरी या चार वर्गा साठी हा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे,निवडणुका जवळ आल्याने दहा वर्षात पहिल्यांदाच मोदींना या वर्गाची आठवण झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले.अदानी म्हणजे देश नाही हे त्यांना आता आठवले याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले. मोदी सरकार चा हा शेवटचा अर्थ संकल्प असल्याची टीका करताना हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेला टोपी घालणारे सरकार असल्याचेही त्यांनी सांगितले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!