रवींद्र कांबळे यांचा टोबॅको फ्री इंडिया ॲवार्डने सन्मानित

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)

विजय ढालपे

गोंदवले –
तंबाखूमुक्त शाळा अभियान पुरस्कार सोहळा 2024 – 25 या वर्षाकरिता रवींद्र कांबळे यांची निवड सलाम मुंबई फाउंडेशन व नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आला.

  पुरस्कार वितरणाचा सोहळा मुंबई प्रेस क्लब मुंबई येथे मोठ्या दिमागदार पद्धतीने संपन्न झाला. सदरचे पुरस्कार माननीय श्री. राजीव निवतकर (आयुक्त,मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाराष्ट्र राज्य) माननीय डॉ.विवेक पाखमोडे ( सहसंचालक मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाराष्ट्र राज्य) माननीय रिटा परवडे (सहाय्यक संचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य) माननीय नंदिनी रामचंद्रन (सीईओ सलाम बॉम्बे फाउंडेशन) माननीय श्री.मनीष जोशी (सीईओ नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्मृतिचिन्ह व 25 हजाराचा रोख रक्कम प्रदान करून पुरस्कार देण्यात आला.

    नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशन गेले 2009 पासून तंबाखू मुक्त शाळा अभियानासाठी आरोग्य विभाग,शिक्षण विभाग यांच्याबरोबर 12 राज्यांमध्ये काम करीत आहे. अभियानाचा एकच हेतू आहे भावी पिढी तंबाखूमुक्त झाले पाहिजे त्यासाठी तंबाखूमुक्त अभियानासाठी जी व्यक्ती जी संस्था काम करत आहे त्यांना प्रोस्तानात्मक म्हणून तंबाखू मुक्त शाळा अभियान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन तर्फे आज प्रधान केले जाणारे पुरस्कार हे पुरस्कार विजेत्यांच्या कठोर परिश्रमाची फलश्रुती आहे असे प्रतिपादन सन्माननीय श्री राजीव निवतकर (आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन महाराष्ट्र)यांनी व्यक्त केले.
डॉ.विवेक पाखमोडे (सहसंचालक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन महाराष्ट्र) यांनी सांगितले की एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून मी हे अनुभवले आहे की युद्धामुळे जितके लोक जे गमावतात त्यापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू केवळ तंबाखूच्या कॅन्सर मुळे होतो त्यामुळे आज जो पुरस्कार विजेत्यांना दिला जातो त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मला असे वाटते की सर्व प्रसार माध्यमाचा योग्य प्रकारे वापर करून तंबाखू विरोधी जनजागृती अधिक प्रभावीपणे करायला हवी,तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनी तंबाखू विषयी जनजागृती करण्यास सोबतच नियमित मुख कर्करोग तपासणी, मुख पूर्व कर्करोग पूर्व व इतर कर्करोगासंबंधी तपासणी उपक्रम हाती घ्यावेत जेणेकरून या समस्येवर वेळेत उपाययोजना करता येतील.
नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशनचे सीईओ सन्माननीय मनीष जोशी सर म्हणाले की तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम अधिक सक्षम करण्याच्या हेतूने आपण यापुढेही सातत्य पणे काम करणे गरजेचे आहे आपण सर्वांची जबाबदारी आता अधिक वाढली आहे आपल्या सोबत आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग आपल्या सोबत आहे त्यामुळे आता आपण सर्वांनी या तंबाखूमुक्त अभियानासाठी जोमाने काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी श्री राजीव निवतकर (आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन महाराष्ट्र राज्य )
श्री डॉ.विवेक पाखमोडे (सहसंचालक डेंटल मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाराष्ट्र राज्य) रिटा परवडे मॅडम (सहाय्यक संचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य) नंदिना रामचंद्रन (सीईओ सलाम बॉम्बे फाउंडेशन) श्री मनीष जोशी (सीईओ नरतम सक्सेरिया फाउंडेशन ) सलाम मुंबई फाउंडेशन उपाध्यक्ष राजश्री कदम,नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन उपाध्यक्ष डॉ. हिमांशू,सलाम मुंबई फाउंडेशन चे जनरल मॅनेजर कल्पना पिलई, असिस्टंट जनरल मॅनेजर दीपक पाटील,असिस्टंट जनरल मॅनेजर मरीना मॅडम आधीसह मान्यवर उपस्थित होते.
छाया – पुरस्कार स्वीकारताना तंबाखू मुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक रविंद्र कांबळे (विजय ढालपे)


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!