व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त राज्यातील रक्तपेढीतील रक्ताचा तुकवत्याचा विचार करून तसेच सर्वसामान्य गरजूना रक्ताची अडचण विचारात घेऊन मा. आमदार आणि दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडूसाहेब यांच्या आवाहना नुसार म्हसवड येथे गुरुवार दिनांक ६ जून रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या म्हसवड येथील म्हसवड शिंगणापूर रोडवरील कार्यालयात सकाळी 11.00 ते 5.00 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदर अभियानात अनेक महिला आणि पुरुष रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून सदर अभियान यशस्वी केले.
सदर रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद बापू पिसे, मार्गदर्शन अँड. आणि मा. नगरसेवक निसार काझी, जी. बी. पारशिक बँकेच माजी रिजनल मॅनेजर श्री. एस. बी. टाकणेसाहेब, संतोषभाऊ गाढवेसाहेब प्रहार पक्षाचे पदाधिकारी नाथाभाऊ शिंदे, श्री. प्रशांतदादा जाधव श्री. फिरोज सय्यद, शब्बीर काझी, बापूसाहेब कोळेकर, रावसाहेब लोखंडे, पिनू पिसे, जोतिराम लोखंडे, इंजिनियर सुशील सरतापे, दत्ताभाऊ लांब, संदीप माने, अजित माने यांचे सहकार्य लाभले.