श्रीपालवन (ता. माण) येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या जनसंवाद दौऱ्याचा भाग म्हणून ग्रामस्थांशी सुसंवाद साधण्यात आला. या दौऱ्यात विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात ग्रामस्थ माता-भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
गावातील 89 लाख 82 हजार रुपयांच्या विविध विकासकामांची यशस्वीपणे अंमलबजावणी झाली असून काही कामे अद्याप सुरू आहेत. यावेळी ग्रामस्थांनी सामाजिक सभागृहाच्या उभारणीसाठी अजून निधीची मागणी केली. आमदार गोरे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की गावाच्या सामाजिक सभागृहासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल.
समारंभात माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन (तात्या) काळे, आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष किसनशेठ सस्ते, माण तालुका भाजपा अध्यक्ष गणेशशेठ सत्रे तसेच इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीपालवन ग्रामस्थांनी दिलेल्या सत्काराचे आमदार गोरे यांनी आभार मानत गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.