मानसोपचार तज्ञ डॉ.अब्दुलकादिर चमनशेख यांचा मानवसेवा पुरस्काराने सन्मानित
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले –
सोशल व्हॅल्यू बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था यांच्यामार्फत मानसोपचार तज्ञ श्री.डॉ.अब्दुलकादिर सिराजुद्दीन चमनशेख यांना मानवसेवा पुरस्काराने बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे मा.डॉ.श्री.संजय कलकूटगी (वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी) मा.डॉ.श्री.अमित लवेकर (मनोविकार तज्ञ जिल्हा रुग्णालय रत्नागिरी) मा.श्री.नितीन शिवदे (समाजसेवा अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे) मा.डॉ.श्री.रुपेश शिंदे (अधीक्षक वैद्यकीय मेडिकल मिरज) मा.शर्वरी पवार (तिचा जागर चे संपादक) , श्री.सुकुमार कांबळे व सोशल व्हॅल्यू बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक श्री.प्रशांत लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.
डॉ.चमनशेख यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून गोर-गरीब लोकांसाठी हिरीरीने व्यसनमुक्ती व मनोरुग्णांसाठी काम करीत आहे. आताच्या घडीला विशेष करून तरुण पिढी तंबाखू,गुटखा,मावा ,सिगारेट,बिडी, दारू,मिश्री,अप्पू,गांजा,यासारखे पदार्थांचे सेवन करून आपले अनमोल जीवन उध्वस्त करून घेत आहेत.तसेच तरुण पिढीमध्ये मानसिक ताण-तणाव वाढत असल्यामुळे मनोरुग्ण संख्यामध्ये देखील वाढ होत चालली आहे.या तरुण पिढीला मानसिक दृष्ट्या संतुलन व व्यसनमुक्त राहण्यासाठी आपल्या सर्वांना मानसिक आरोग्य विषयी व व्यसनमुक्ती विषयी खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती काम करणे गरज असल्याचे सांगितले.
येत्या महिन्याभरात सिराज हॉस्पिटल व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये सिराज हॉस्पिटल व सहाय्यक सेवाभावी संस्थेमार्फत मोफत समुपदेशन केले जाणार आहे.