सपोनि राजकुमार भुजबळ यांचा सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस अधिक्षक सातारा यांचेकडून गौरव
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
सपोनि राजकुमार भुजबळ यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केले बद्दल पोलीस अधिक्षक यांचेकडून प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला
सपोनी राजकुमार भुजबळ यांना अभिनंदनपर दिलेल्या पत्रात समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा यांनी म्हटले आहे की
ग्रामपंचायत निवडणूक २०२२ चे अनुषंगाने सातारा जिल्हयामधील एकुण ३१९ गावांमध्ये दि.१८/१२ /२०२२ रोजी निवडणूक प्रक्रिया व दिनांक २०/१२/२०२२ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्हा हा नेहमीच क्रियाशिल असून राजकीय दृष्टया विशेष संवेदशिल मानला जातो. राजकीय स्वरुपाचे हेवेदावे अथवा राजकीय पक्षातील अंतर्गत गटबाजी, विविध मान्यवर व्यक्तींमधील राजकीय संघर्ष हे पहाता ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये गावपतळीवर नेहमीच तणावाचे वातावरण असते, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत, तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पार पाडणे हे मोठे आव्हान सातारा जिल्हा पोलीस दलापुढे होते. परंतु संपुर्ण निवडणूक प्रक्रिया विनाअडथळा व कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेत पार पडलेली आहे.
एकंदरीत आपण केलेले बंदोबस्ताचे सुयोग्य नियोजन केले तसेच अत्यंत कौशल्याने, प्रामाणिकपणे, सतर्कपणे व कार्यतत्पर राहून संपुर्ण बंदोबस्त उत्कृष्टरित्या पार पाडला आहे. संपुर्ण निवडणूक प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेत पार पडली आहे. हे आपल्या कुशल नेतृत्वामुळेच शक्य झालेले आहे.
आपण केलेल्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत आपले “हार्दिक अभिनंदन ” करण्यात येत आहे. भविष्यात देखील आपण कार्यतत्पर राहून अशीच कामगिरी कराल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.
शुभेच्छासह…
आपला स्नेहांकित, (समीर शेख )