दहिवडीचे सपोनि अक्षय सोनवणे विशेष पुरस्काराने सन्मानित
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोदवले –
दहिवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सपोनि अक्षय सोनवणे यांनी दहिवडी पोलीस स्टेशनचा कारभार स्वीकारल्यानंतर उल्लेखनीय कामगिरी केली.
दहिवडी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना 60 ते 65 सीसीटीव्ही तपासून ,विशेष पथक तयार करून, प्रसंगावधान दाखवून ,तातडीने व जलद कार्यवाही केल्यामुळे अवघ्या चार तासात शोधून त्यांच्याकडून गुन्ह्यातील जवळपास 80 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आज आदरणीय पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर यांनी 25 हजार रुपये बक्षीस रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले
आजपर्यंत त्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावणे, विशेष पथक तयार करत प्रसंगावधान दाखवून तातडीने व जलद कारवाई केल्या बद्दल हे मानांकन देण्यात आलं आहे
या एकंदरीत कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस प्रमुखांनी त्यांना रोख पंचवीस हजार रुपये बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले आहे. यावेळी पोलीस हवालदार बापू खांडेकर, धनंजय घाटगे, पोलीस नाईक स्वप्नील म्हामणे, पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र गाढवे, अजिनाथ नरबट, सुहास गाडे, सागर लोखंडे, निलेश कुदळे आदी उपस्थित होते.