म्हसवड पोलीस स्टेशनला पायाभूत सुविधा द्या…..प्रा. विश्वंभर बाबर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड.… प्रतिनिधी
म्हसवड पोलीस स्टेशनलाआवश्यक असणाऱ्या किमान पायाभूत सुविधा तातडीने देण्यात याव्यातअशी मागणी किसान काँग्रेसचे पुणे विभाग उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
या बाबतचे  लेखी निवेदन प्रा. विश्वंभर बाबर यांनी सातारा जिल्हा  पोलीस अधीक्षक  माननीय समीर शेख यांना नुकतेच दिले.यावेळी पत्रकार महेश कांबळे, ह .भ. प. दादासाहेब नरळे,सामाजिक कार्यकर्ते सचिन नवगण व गणेश लोहार उपस्थित होते.या निवेदनात म्हटले आहे की  म्हसवड  पोलीस ठाणे स्थापनेपासून मंजूर असणारी पोलीस कर्मचाऱ्यांची 44 ही संख्या आजही तशीच आहे.      म्हसवड हे नगरपालिकेचे गावअसून येथील व आसपासच्या  59 गावातील लोकसंख्या दोन लाखाच्या पेक्षा जास्त वाढलेली आहे .लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारी वाढली मात्र मंजूर कर्मचारी संख्या पूर्वीप्रमाणेच आहे.याचा  विपरीत परिणाम पोलीस कर्मचाऱ्यावर होत असून कामाचा ताणही दिवसे दिवस वाढतच आहे.मंजूर 44 कर्मचाऱ्यापैकी दहा ते बारा कर्मचारी नेहमीच प्रतिनियुक्ती, न्यायालयीन काम, वरिष्ठ कार्यालयाकडे कार्यालयीन काम,  व इतर कारणास्तव बाहेरगावी असतात ही वस्तुस्थिती आहे.कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत असून त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे.यावर उपाय म्हणून वाढीव कर्मचारी मिळणे गरजेचे असल्याचे प्रा. बाबर यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या निदर्शनाला आणून दिले.
       याबरोबरच म्हसवड पोलीस स्टेशन आवारात पोलीस निवास व्यवस्थे साठी ज्यादा खोल्या उपलब्ध करून देण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आले आहे.मंजूर कर्मचाऱ्यांच्या क्षमतेपेक्षा खूपच कमी म्हणजे केवळ 20 खोल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत.  उर्वरित कर्मचाऱ्यांना त्यांची निवास व्यवस्था खाजगी स्वरूपात म्हसवड शहरात करावी लागलेली आहे.याचा विपरीत परिणाम अत्यंत निकडीच्या कामाच्या वेळी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.याशिवाय ज्या उपलब्ध वीस निवास खोल्याआहेत त्याचे बांधकाम अनेक ठिकाणी पडलेले आहे, तसेच अनेक ठिकाणी मोडतोड झालेली असून त्याची डागडुजी तातडीने होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटलेले आहे.
       लेखी  निवेदनातील दोनही मागण्या अग्रक्रमाने पूर्ण करण्याची विनंती प्रा. विश्वंभर बाबर व त्यांच्या सर्व सहकार्याने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केलेली आहे

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!