**उंब्रजमध्ये कोलकाता घटनेच्या निषेधार्थ निषेध सभा **

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते
उंब्रज, दि. १८-
मौजे उंब्रज येथे कोलकाता येथील आर.जी. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षीत डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरील ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येणार आहे

      या निषेध मोर्चाचे आयोजन सर्व ग्रामस्थ, सर्व डॉक्टर, केमिस्ट आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्वांच्या वतीने करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आणि न्यायाची मागणी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

         उंब्रजच्या बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर होणाऱ्या या निषेध मोर्चात महिला, पुरुष, युवा वर्ग, तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील. अशा घटनांचा पुन्हा कधीच पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवावा, असे या मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!