उंब्रज पोलिसांची तत्पर कारवाई – 36 तासांत दोषारोपपत्र दाखल
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज/प्रतिनिधी
मौजे फडतरवाडी (ता. पाटण, जि. सातारा) येथे घडलेल्या विनयभंग व शिवीगाळ प्रकरणात उंब्रज पोलिसांनी अवघ्या 36 तासांच्या आत पाटण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून जलदगती तपासाचे उदाहरण घालून दिले आहे.
फिर्यादी व आरोपीतदीर यांच्यात वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून वाद निर्माण झाला होता. त्यातून आरोपीने फिर्यादी महिलेचा विनयभंग व शिवीगाळ केली. या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
महिला विषयक गुन्ह्यांवर तातडीने व कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्रीमती राजश्री पाटील यांनी दिल्या होत्या.
त्याच पार्श्वभूमीवर उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी API रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कचरे यांनी गतिमान तपास पूर्ण करून अवघ्या 36 तासांत माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या कारवाईत PSI सागर खबाले, पो. हवा. सचिन जगताप, पो. शि. श्रीधर माने, प्रकाश कार्वेकर, प्रफुल पोतेकर, विकास शिंदे व प्रशांत पवार यांनी मोलाची मदत केली.
ही कारवाई महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब टाळून जलद न्याय मिळवून देण्यासाठी उंब्रज पोलिसांची तत्परता दिसून येते.
–

