प्राध्यापिका कविताताई म्हेत्रे यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी निवड — म्हसवडकरांचा अभिमान
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्राध्यापिका कविताताई म्हेत्रे यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. या निवडीमुळे संपूर्ण माण-खटाव परिसरासह म्हसवड शहरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.
प्राध्यापक कविताताई म्हेत्रे या शिक्षण, सामाजिक कार्य व राजकीय कार्यक्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रीय असून, महिला सक्षमीकरण, शिक्षणाचा प्रसार, वंचित घटकांसाठी काम हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय राहिले आहेत. त्यांच्या संयमी व सर्वसमावेशक नेतृत्वशैलीमुळेच त्यांची निवड प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आली असल्याचे मान्यवरांचे म्हणणे आहे.
या यशाबद्दल त्यांचे माण-खटाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब, सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ सोनवणे, बाळासाहेब माने साहेब, संजय पाटील, सनी शेटे, शंकर शेठ इंगळे, गणेश जगदाळे, गणेश कदम आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी बोलताना प्रभाकरजी देशमुख म्हणाले, “प्राध्यापक कविताताई यांची निवड म्हणजे संपूर्ण माण-खटाव भागातील जनतेचा सन्मान आहे. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न पक्षाच्या उच्च पातळीवर मांडले जातील, याबाबत आम्ही निश्चिंत आहोत.”
या प्रसंगी विविध पक्ष पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, विद्यार्थी प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा गौरव म्हसवड शहरासह संपूर्ण माण-खटाव तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.